पंजाबमधील काँग्रेसचा (Punjab Congress) गोंधळ काही कमी होताना दिसत नाही आहे. कालच्या राजीनाम्यानंतर आणि पंजाबमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी बुधवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.या व्हिडिओत (Video) सिधुंनी ' मी आपल्या मुद्यांवर तडजोड करू शकत नाही मी योग्य आणि सत्यासाठी लढा देतच राहील.' असे सांगत त्यांनी आपला इरादाच स्पष्ट केला आहे. जाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष (Punjab Congress President) पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांचे हे पहिले मोठे विधान आहे. आणि या विधानाने पुन्हा नवीन चर्चांना उधाण आले आहे.(Navjot Singh Sidhu Post video message after resigned from Punjab Congress President post)
आज प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत 'प्रिय पंजाब्यांनो,मी 17 वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला आहे. पंजाबमधील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि मुद्यांचे राजकारण करण्यासाठी. हा माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्य आहे, मी कोणतीही वैयक्तिक लढाई लढलेली नाही. माझा लढा मुद्यांसाठी आहे, पंजाबचा स्वतःचा अजेंडा आहे. हा अजेंडा घेऊन, मी माझ्या हक्कांसाठी लढत आहे, यासाठी कोणतीही तडजोड नाही.' असे सांगत त्यांनी सर्वांना विचार करायला भाग पडला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू पुढे म्हणाले, 'माझ्या वडिलांनी मला फक्त एकच गोष्ट शिकवली आहे, जिथे अडचणी येतात तिथे सत्यासाठी लढा. जेव्हा जेव्हा मी पाहतो की सत्याशी तडजोड केली जात आहे, जेव्हा मी पाहतो की ज्यांनी काही काळापूर्वी बादल सरकारला क्लीन चिट दिली, त्यांनी मुलांवर गोळीबार केला, त्यांना न्यायाची जबाबदारी देण्यात आली. ज्यांनी उघडपणे जामीन दिला आहे, ते महाधिवक्ता आहेत.' असे सांगत माजी मुख्यमंत्रावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
आपल्या व्हिडिओ संदेशात सिद्धू म्हणाले, 'मी ना हायकमांडला दिशाभूल करू शकतो आणि ना कोणाला दिशाभूल करू देतो. मी पंजाबच्या लोकांसाठी काहीही बलिदान देईन, पण मी माझ्या तत्त्वांवर लढेल. कलंकित नेते, कलंकित अधिकारी परत करून तीच व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. व्हिडिओच्या शेवटी नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, जर तत्त्वे आगीखाली येतात, तर टक्कर देणे आवश्यक आहे, जिवंत असल्यास, जिवंत दिसणे आवश्यक आहे.'
विशेष म्हणजे नवजोतसिंग सिद्धू यांनी कालच आपले प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे . असे मानले जात होते की नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब सरकारमधील काही मंत्र्यांच्या नियुक्तीला तसेच महाधिवक्ता पदाला विरोध केला होता, परंतु मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी त्यांचे ऐकले नाही आणि स्वतः निर्णय घेतला.त्यामूळे ते नाराज आहेत. असे बोलले जात आहे.
या मुद्यावरून वाद वाढला आणि सिद्धू यांनी हे पद सोडले. मात्र, काँग्रेस हायकमांडही या मुद्द्यावर बॅकफूटवर येत नाही. असे मानले जाते की आता काँग्रेसने पंजाबमध्ये आपल्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा शोध सुरू केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.