आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये पंजाब राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना पंजाब निवडणुकीबाबत त्यांच्या कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सिद्धू यांची मुलगी राबिया (Rabia Kaur Sidhu) पंजाबमध्ये भाजप कॉंग्रेसवर (Congress) हल्लाबोल करत आहे. 'हायकमांडची मजबुरी असावी, परंतु प्रामाणिक माणसाला कोणीही रोखू शकत नाही. बेईमानी थांबली पाहिजे, सिद्धू पंजाबसाठी जगतात म्हणून त्यांना पुढे येऊ दिले जात नाही,' म्हणत राबियाने टीकास्त्र सोडले. ज्यांच्या खात्यात 133 कोटींहून अधिक रक्कम आहे, तो गरीब असूच शकत नाही. चन्नीजी गरीब नाहीत. ते करोडपती गरीब आहेत, असे म्हणत राबियाने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना घरचा आहेर दिला.
दरम्यान, सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनीही याबद्दल बोलल्या आहेत. आम्ही चरणजीत सिंह चन्नी यांच्यापेक्षा गरीब आहोत, त्यांचे घर पहा, आमचे घर पहा, असही नवज्योत कौर सिद्धू यावेळी म्हणाल्या. त्याचवेळी वडिलांसाठी प्रचार करणाऱ्या राबिया सिद्धूंसाठी इमोशनलही झाली. जोपर्यंत वडील निवडणूक जिंकत नाहीत, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिनं म्हटलं आहे. राबियाने तिची आई नवज्योत कौर सिद्धू यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली, ज्यात नवज्योतने मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते.
तसेच, अकाली दलाचे उमेदवार बिक्रम सिंह मजिठिया हे माझ्या पप्पांकडून राजकारण शिकले. यातच त्यांचा एक व्हिडिओ देखील आहे ज्यामध्ये ते सिद्धू यांना मित्र म्हणत आहेत. राबिया सिद्धूने अमृतसरमध्ये डोअर टू डोअर प्रचार केला. मजिठिया त्यांना जो पंजाब निर्माण करायचा आहे ते थांबवण्यासाठी इथे आले आहेत. नाही तर तू इतरत्र का नाही गेलास? मजिठिया एकच जागा लढवणार असल्याच्या चर्चेवर राबिया म्हणाल्या की, अप्रत्यक्षपणे बिक्रम दोन्ही जागांवरुन निवडणूक लढवत आहेत.
सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते
दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका मुलाखतीत सांगितले की, '60 आमदार मिळतील की नाही, हे पंजाबचे लोक ठरवतील. 60 आमदार जिंकून आले नाहीत तर मुख्यमंत्री कसा होणार? एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की, राजकारणात काहीही ठरवले जात नाही. नवज्योतसिंग सिद्धू पुढे म्हणाले, 'जर 60 आमदार जिंकले तर आमचा मुख्यमंत्री होईल, पण तसे झाले नाही तर दुसरे कोणीतरी सरकार बनवेल, किंवा कोणाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल याबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.