Central Ministry: राणेंचं मंत्रिपद निश्चित !

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात(Central Ministry) 53 मंत्री आहेत असून आजच्या विस्तारानंतर हा आकडा 81वर जाईल, अशी चर्चा आहे.
Narayan Rane's Union Minister post fixed FOR Central Ministry
Narayan Rane's Union Minister post fixed FOR Central MinistryDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या काळात होत असलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणूका आणि आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्रिमंडळाचा(Central Ministry) आज विस्तार होत आहे. मोदींच्या(Narendra Modi) दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विस्तार असल्याने सगळ्यांच्या नजरा या विस्ताराकडे लागली आहेत. मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबद्दल कुणालाच अधिकृत माहिती नसली तरी महाराष्ट्रामधून(Maharashtra) एक नाव निश्चित झाले आहे ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यासाठी नारायण राणे सपत्नीक कालच दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळातील त्यांच्या संभाव्य समावेशामुळे कोकणातील भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मंत्रिमंडळ विस्तार करताना विविध राज्यांच्या विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखणार हे नक्की होत आणि तसेच होताना दिसत आहे . सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत असून आजच्या विस्तारानंतर हा आकडा81 वर जाईल, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात स्थान देताना सर्वंकष विचार केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, हीना गावित, प्रीतम मुंडे यांच्या नावांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

Narayan Rane's Union Minister post fixed FOR Central Ministry
Delhi: 'त्या' विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई नको- मनीष सिसोदिया

राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला यापूर्वीच प्रदेश कार्यकारिणीने सहमती दर्शविल्याचे सांगितले जाते. कोकणात सध्या भाजपचा एकही मंत्री नाही. त्यातच पुढील लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढवायची झाल्यास कोकणात पूर्ण ताकदीचे नेतृत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे राणेंना मंत्रिमंडळात स्थान देऊन कोकणासह राज्यातील शिवसेनेशी दोन हात करण्याचे बळ देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. आणि याच निकषावर सेनाला शह देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार होत आहे हे नक्की .

नारायण राणे हे मुळातच आक्रमक नेते त्यातच ते सेनेवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. राज्यात महाविकासआघडी सरकार आहे जर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाला खूप मोठे नुकसान महाराष्ट्रात सहन करावे लागेल. कोकणचा विचार करता दोन्ही लोकसभा खासदार महाविकासआघडीचे आहेत भाजपला कोकणात जर पक्षवाढवायचा असेल तर राणेंना मंत्रिपदात देणे गरजेचे आहे. आणि याचमुळे भाजपाने ही रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com