Rahul Gandhi: राहुल गांधींना आणखी एक झटका, 'या' राज्यात मानहानीचा गुन्हा दाखल

Rahul Gandhi Disqualification: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Rahul Gandhi Disqualification: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले असून आता त्यांच्याविरुद्ध हरिद्वार न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

आरएसएस कार्यकर्ते कमल भदोरिया यांनी हा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.

हरिद्वार जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायदंडाधिकारी द्वितीय शिव सिंह यांच्या न्यायालयाने हे प्रकरण स्वीकारले आहे.

प्रकरण काय आहे

वास्तविक, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरएसएसला आजच्या काळातील कौरव म्हटल्याबद्दल आणि पुजार्‍यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल हा खटला दाखल करण्यात आला आहे.

हरिद्वार सीजेएम न्यायालयाला दिलेल्या या याचिकेत म्हटले आहे की, 9 जानेवारी 2023 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एका जाहीर सभेत आरएसएसचे वर्णन आधुनिक युगातील कौरव असे केले होते.

आपल्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले होते की, आजचे कौरव लाठ्या घेऊन हाफ पँट घालतात आणि शाखा लावतात. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या वक्तव्यावर आरएसएस कार्यकर्ते कमल भदोरिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Bungalow: राहुल गांधींना नोटीस; 'या' तारखेपर्यंत सोडावा लागणार सरकारी बंगला

राहुलवर हल्ला

पुजाऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींवर भदोरिया यांनी हल्लाबोल केला. भदोरिया यांनी अर्जात म्हटले आहे की, राहुल यांनी पुजारी आणि सनातनींना दुखावणारे वक्तव्य केले आहे.

अर्जात म्हटले आहे की, देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करुनही काँग्रेस नेत्याने असे वक्तव्य केले आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की, राहुल गांधी यांना 11 जानेवारी रोजी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

यामध्ये त्यांना या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधींची खासदारकी रद्द ; काळे कपडे परिधान करुन मोदींचा निषेध

दुसरीकडे, मोदी सरनेम बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली आहे.

यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व गेले. मात्र, या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांनी अद्याप उच्च न्यायालयात (High Court) अपील केलेले नाही. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com