Mysore Pak: 'श्री' नव्हे, 'पाक'च! 'म्हैसूर पाक' शब्द बदलण्याला वंशजांकडून आक्षेप

Mysore Pak controversy: मिठाईंच्या नावातील 'पाक'हा शब्द बदलून त्याऐवजी 'श्री' असा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे
Mysore Pak name change
Mysore Pak name changeDainik Gomantak
Published on
Updated on

जयपूर: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या लष्करी कारवाईने देशभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पाकिस्तानविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी आता जयपूरमधील तीन प्रसिद्ध मिठाईवाल्यांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी त्यांच्या मिठाईंच्या नावातील 'पाक'हा शब्द बदलून त्याऐवजी 'श्री' असा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'पाक' हा शब्द असलेल्या सर्व पारंपरिक मिठाईंची नावे बदलण्यात आली आहेत. नवीन बदललेल्या नावांप्रमाणे आता 'आम पाक' आता 'आम श्री' म्हणून ओळखला जाईल. 'गोंद पाक' चे नाव आता 'गोंद श्री' झाले आहे. 'स्वर्ण भस्म पाक' ला 'स्वर्ण श्री' असे नवीन नाव मिळाले आहे. 'चांदी भस्म पाक' आता 'चांदी श्री' म्हणून विकला जाईल. तर सर्वात महत्वाचं म्हणजे म्हैसूरपाकचं नावं म्हैसूरश्री करण्यात आलंय.

"याला दुसरे कोणतेही नाव असू शकत नाही"

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधी भावना उफाळून आल्या असताना, जयपूरमधील काही मिठाईवाल्यांनी 'म्हैसूर पाक' या मिठाईच्या नावातील 'पाक' हा शब्द हटवून त्याऐवजी 'श्री' हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र याला 'म्हैसूर पाक' या मिठाईचे जनक काकासुरा मडप्पा यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ही केवळ एका मिठाईच्या नावातील बदलाची बाब नसून, परंपरेचा आणि इतिहासाचा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काकासुरा मडप्पा हे म्हैसूरच्या राजघराण्यातील वाडियार कुटुंबाचे शाही आचारी होते, ज्यांना या मिठाईच्या निर्मितीचे श्रेय दिले जाते.

Mysore Pak name change
India Pak Relations: पाकिस्तानसोबत शांततेसाठी चर्चा करा, माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचे गोव्यात वक्तव्य

त्यांचे पणतू एस. नटराज यांनी या वादावर आपली तीव्र भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, "म्हैसूर पाक' हे आमच्या पूर्वजांनी शोधून काढलेल्या या मिठाईचे नाव आहे. याला दुसरे कोणतेही नाव असू शकत नाही."

नटराज यांनी स्पष्ट केले की, कन्नड भाषेत 'पाक' या शब्दाचा अर्थ साखरेचा पाक असा होतो. ही मिठाई म्हैसूरमध्ये शोधली गेली असल्याने तिला 'म्हैसूर पाक' असे नाव मिळाले. यात कोणताही 'पाकिस्तान'शी संबंध नाही. "ज्याप्रमाणे प्रत्येक स्मारक किंवा परंपरेचे स्वतःचे योग्य नाव असते, त्याचप्रमाणे 'म्हैसूर पाक'चेही आहे. त्याचे चुकीचे चित्रण करू नका," अशी विनंती मडप्पा यांच्या वंशजांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com