VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! शाळेच्या व्हॅनला रेल्वेची धडक; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 5 जखमी

Murshidabad Accident Latest Update: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.
Murshidabad Accident
Murshidabad AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी शाळेच्या व्हॅनला भरधाव प्रवासी रेल्वेने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे क्रॉसिंगवर घडला भीषण अपघात

ही घटना मुर्शिदाबादमधील बहरामपूर परिसरातील कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडली. सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी व्हॅन जात असताना ती रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याचवेळी वेगाने धावणारी प्रवासी रेल्वे समोर आल्याने चालकाला वाहन थांबवण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी रेल्वेने व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि त्यातील प्रवासी बाहेर फेकले गेले.

Murshidabad Accident
Goa Kamdhenu Scheme: सुधारित 'कामधेनू' योजना सुरू; गाय खरेदीसाठी 90.75 टक्क्यांचे अनुदान- मुख्यमंत्री डॉ.सावंत, दूध व्यावसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण

प्रत्यक्षदर्शींकडून निष्काळजीपणाचा आरोप

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका मार्गावरील रेल्वे गेल्यानंतर फाटक पुन्हा उघडण्यात आले होते.

मात्र दुसऱ्या मार्गावरून आणखी एक रेल्वे येत असतानाही फाटक बंद करण्यात आले नव्हते. त्यामुळे वाहनचालकाने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि काही क्षणांतच भीषण अपघात घडला. या प्रकरणात क्रॉसिंगवरील गेटमनच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Murshidabad Accident
Goa PMFBY: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत मोठा बदल; नव्या नियमामुळे ऊस ,भुईमूग शेतकरी चिंतेत

स्थानिकांनी धाव घेत केली मदत

अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना आणि चालकाला बाहेर काढून त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले असून रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी केली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे फाटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com