पालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये CBI ची छापेमारी, ममता सरकारमधील मंत्री...

पश्चिम बंगालमधील WB नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी (WB Municipality Recruitment Scam) CBI आज (रविवार) छापेमारी करत आहे.
CBI Arrested New channel commercial Head
CBI Arrested New channel commercial Head Dainik Gomantak
Published on
Updated on

WB Municipality Recruitment Scam: पश्चिम बंगालमधील WB नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी (WB Municipality Recruitment Scam) CBI (रविवार) छापेमारी करत आहे.

कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम आणि त्यांच्या निकटवर्तीयांसह पश्चिम बंगाल सरकारमधील शहरी आणि नगरपालिका व्यवहार मंत्री यांच्या निवासस्थानांवर छापेमारी करण्यात आली आहे.

कोलकाता, कांचरापारा, बराकपूर, हलीशहर, दम दम, उत्तर दम दम, कृष्णा नगर, ताकी, कमरहाटी, चितला आणि भवानीपूरसह 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात येत आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने 21 एप्रिल 2023 रोजी हा गुन्हा नोंदवला होता. ईडी पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करत असताना, त्यांना महापालिका भरतीतील घोटाळ्याची माहिती मिळाली, ज्याची माहिती एजन्सीने कोलकाता उच्च न्यायालयाला दिली होती. या माहिती आणि पुराव्यांनंतर न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते.

CBI Arrested New channel commercial Head
पार्थ चॅटर्जींच्या अटकेनंतर Mamata Banerjee ची प्रतिक्रीया, जर कोणी दोषी असेल तर ...'

तपासात ही बाब समोर आली

न्यायालयाच्या आदेशानंतर, सीबीआयने अयान सील आणि त्यांची कंपनी मेसर्स एबीएस इन्फोझोन प्रायव्हेट लिमिटेड आणि अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

पश्चिम बंगालमधील पालिका आणि शिक्षकांच्या भरतीत घोटाळा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

अयान सीलच्या कंपनीला ग्रुप सी आणि डीच्या भरतीसाठी कंत्राट देण्यात आले होते आणि या कंपनीला पेपर बनवण्यापासून ते ओएमआर शीट स्कॅन करणे आणि त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करण्याचे अधिकार होते.

याचा फायदा घेत सरकारी अधिकारी, मंत्री आणि या कंपनीच्या मालकाने कट रचून मनमानी पैसे घेऊन चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली.

CBI Arrested New channel commercial Head
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा

विशेष म्हणजे, याच प्रकरणात ईडीने 5 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील मंत्री रथिन घोष यांच्या घरावरही छापा टाकला होता. आज सीबीआय (CBI) याच प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापे टाकत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com