MS Dhoni UK Police Arrest: क्रिकेट विश्वात खळबळ! एमएस धोनीला अटक? UKमध्ये नेमकं काय घडलं? व्हिडिओ होतोय VIRAL

MS Dhoni Arrest: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
MS Dhoni UK Police Arrest
MS Dhoni UK Police ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक क्रिकेटप्रेमी चकित झाले असून, धोनीच्या चाहत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रत्यक्षात या व्हिडिओमागील सत्य काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की, धोनी एका सार्वजनिक ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चाहते जमा झाले आहेत. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

त्यामुळे काहींनी गैरसमज करून हा व्हिडिओ “धोनीला अटक” असा दावा करत सोशल मीडियावर शेअर केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की धोनीला अटक करण्यात आलेली नाही, तर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

MS Dhoni UK Police Arrest
Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

धोनी जिथे जिथे जातो, तिथे त्याच्या चाहत्यांचा प्रचंड जमाव उमटतो. यावेळीही चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गर्दी अनियंत्रित होऊ नये म्हणून सुरक्षारक्षकांनी त्याला वेढा घालून सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे काही क्षणांसाठी परिस्थिती तणावपूर्ण वाटली, पण त्यात कोणताही वाद किंवा अटकप्रसंग घडलेला नाही.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आणि शेअर्स होत आहेत. काही जणांनी विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी चिंता व्यक्त केली. मात्र काही वेळातच धोनीचे फॅनपेज आणि स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केलं की हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल करण्यात आला आहे.

MS Dhoni UK Police Arrest
Goa Tourism: दसऱ्यानंतर फिरायला जाताय? मग गोव्यातल्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

या घटनेतून पुन्हा एकदा धोनीची लोकप्रियता आणि त्याच्यावरील चाहत्यांचा वेडापिसा प्रेम जगासमोर आलं आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. यूकेमध्ये झालेल्या या घटनेमुळे “कॅप्टन कूल” पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com