पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. शनिवारी मर्दान जिल्ह्यात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या रॅलीत ही घटना घडली. यावेळी इम्रान रॅलीत उपस्थित नव्हते.
ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
लिंचिंगचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस मारहाण करणाऱ्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 'द फ्रायडे टाईम्स'मधील वृत्तानुसार, 40 वर्षीय निगार आलमने रॅलीमध्ये पीटीआय नेते इम्रान खान यांची तुलना पैगंबराशी केली. ईशनिंदेचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव मौलाना निगार आलम यांच्यावर दगडफेक करताना दिसत आहे.
पीटीआयच्या रॅलीत सहभागी झालेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मर्दान शहरातील सावल ढेर भागात शनिवारी ही घटना घडली.
निगार आलम नावाच्या व्यक्तीला खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने आयोजित केलेल्या रॅलीत समारोपाची प्रार्थना करण्यास सांगितले होते, त्यानंतर जमावाने त्याच्या वक्तव्याचा निषेध केला.
लोकांच्या एका गटाने भिंतीवर चढून आत प्रवेश केला आणि त्याला लाठ्या आणि रॉडने मारहाण केली.
दरम्यान, पीटीआय नेते इम्रान खान या रॅलीत उपस्थित नव्हते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेवर तात्काळ भाष्य केले नाही. सेंटर फॉर सोशल जस्टिसच्या म्हणण्यानुसार, 1987 पासून पाकिस्तानमध्ये 2,000 हून अधिक लोकांवर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला आहे. अशाच आरोपांसाठी जमावाकडून किमान 88 लोक मारले गेले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.