Monsoon 2025: मान्सूनचं वेळेआधीच आगमन, अरबी समुद्रामध्ये दाखल झाल्याची हवामान विभागाची माहिती

Weather Update: नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच दाखल झाले असून, गुरुवारी हे वारे अरबी समुद्रात पोहोचले. मॉन्सूनने आता मालदीवच्या काही भागांपर्यंत आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केलीय.
Monsoon 2025
Monsoon 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच दाखल झाले असून, गुरुवारी हे वारे अरबी समुद्रात पोहोचले. मॉन्सूनने आता मालदीवच्या काही भागांपर्यंत आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली असून, लवकरच मॉन्सून भारतात झपाट्याने पुढे सरकणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत.

मॉन्सूनची सुरुवात यंदा विशेषत्वाने लवकर झाली आहे. १३ मे रोजीच तो दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता. यामुळे सामान्य वेळेपेक्षा जवळपास पाच दिवस आधीच मॉन्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.

Monsoon 2025
Goa Travel Guide: गर्लफ्रेन्ड, बायको किंवा मित्रांसोबत गोवा फिरायचाय? कुठं फिराल, काय खायचं - प्यायचं, खर्च किती येईल? वाचा एका क्लिकवर

हवामान विभागानुसार, मॉन्सूनचा प्रवास सध्या वेगाने होत असून, २७ मेपर्यंत तो केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण भारतात वेळेआधी पाऊस सुरू झाल्यास, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अंदमान बेटांमध्ये जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण आहे, जे मॉन्सूनसाठी अनुकूल मानले जाते.

Monsoon 2025
Goa News: सरकारी आदेशाला केराची टोपली, पिसुर्लेत रस्त्याचे खोदकाम सुरुच; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

भारतीय हवामान खात्याने यंदाचा मॉन्सून 'सर्वसाधारण' राहील, असा अंदाज याआधीच जाहीर केला आहे. तथापि, मॉन्सूनची सुरुवात वेळेआधी होत असल्याने जून महिन्यात काही भागांत अधिक पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com