Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Mohammad Yousuf Statement: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकली.
Mohammad Yousuf Statement
Mohammad YousufDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammad Yousuf Statement: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकली. यापूर्वी भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल अपशब्द वापरणाऱ्या युसूफने यावेळी आशिया कप 2025 च्या ट्रॉफी विवादावर भाष्य केले असून टीम इंडियाविरोधात (Team India) वादग्रस्त वक्तव्य केले. मोहम्मद युसूफच्या मते, पीसीबीचे प्रमुख आणि अशियन क्रिकेट कॉन्सीलचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी केलेले कृत्य अगदी बरोबर होते आणि ते आता जे करत आहेत तेही योग्य आहे.

ट्रॉफी विवादाचे मूळ कारण

आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत ट्रॉफी जिंकली. मात्र, टीम इंडियाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. नक्वी हे एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्री (Home Minister) देखील आहेत. भारतीय कॅम्पचे म्हणणे होते की, ते नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत.

या प्रकारानंतर नक्वी मैदानातूनच ट्रॉफी घेऊन निघून गेले. त्यामुळे भारताला अद्याप ट्रॉफी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, नक्वी यांचे म्हणणे आहे की ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात आहे. जर भारताला ट्रॉफी हवी असेल, तर त्यांना ती त्यांच्याच हातून घ्यावी लागेल. फायनल होऊन तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, तरीही टीम इंडियाला आशिया कप 2025 ची ट्रॉफी मिळालेली नाही.

Mohammad Yousuf Statement
Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

युसूफची नक्वीला 'क्लीन चिट'

पाकिस्तानच्या 'समा टीव्ही' या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद युसूफने मोहसिन नक्वी यांच्या भूमिकेला 'एकदम योग्य' ठरवले. युसूफ म्हणाला, "चेअरमन सर (मोहसिन नक्वी) जे करत आहेत, ते पूर्णपणे बरोबर आहे. त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे."

या माजी पाकिस्तानी फलंदाजाने पुढे म्हटले, "भारताने त्याचवेळी ट्रॉफी घ्यायला हवी होती. एसीसी (ACC) आणि आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, ते तिथे एसीसी चीफ म्हणून उभे होते आणि ट्रॉफी त्यांच्याच हस्ते दिली जायला हवी होती."

Mohammad Yousuf Statement
Asia Cup Controversy: टीम इंडियाला ट्रॉफी मिळणार की नाही? सूर्यकुमार यादववर होणार कारवाई? नियम काय सांगतो? वाचा

'तुम्ही बॉलिवूडमधून बाहेर या'

यावेळी मोहम्मद युसूफने टीम इंडियावर आणि खेळाडूंवर टीका करताना म्हटले, "तुम्ही त्या वेळी ट्रॉफी घेतली नाही, तर आता इतकी घाई कशासाठी आहे? जर तुम्हाला आता आठवण झाली की ट्रॉफी घ्यायची आहे, तर तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन ती घ्यायला हवी होती."

युसूफने भारतीय खेळाडूंना 'फिल्मी' म्हणत आपला संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "मी त्या दिवशीही हे बोललो होतो की हे लोक अजूनही फिल्मी दुनियेतून बाहेर आलेले नाहीत. हा खेळ आहे. इथे फिल्मीगीरी चालणार नाहीत. चित्रपटांमध्ये 'रिटेक' वगैरे सर्व काही होते. पण चित्रपटांमध्ये हिरो बनणे ही वेगळी गोष्ट आहे. तुम्ही इथे वास्तवात आहात आणि आता तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला ट्रॉफी हवी आहे."

Mohammad Yousuf Statement
Asia Cup 2025 Final: रन चेसिंगचा नवा बादशाह 'भारत'! टीम इंडियानं बनवला नवा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिला संघ

मोहम्मद युसूफने काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह क्रिकेट शोमध्ये भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. युसूफ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com