Cricketer Banned : क्रिकेट विश्वात खळबळ! स्टार खेळाडूवर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, बोर्डाने ठोठावली बंदी

Mohammad Irfan Junior Banned 5 Match : पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान ज्युनियरवर क्रिकेट व्हिक्टोरियाने पाच सामन्यांची बंदी घातली आहे.
Cricketer Banned
Ball Tampering CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricketer Mohammad Irfan Junior Banned

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान ज्युनियरवर क्रिकेट व्हिक्टोरियाने पाच सामन्यांची बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत एका सामन्यादरम्यान चेंडू छेडछाडीचा आरोप त्याच्यावर आहे.

इरफान ज्युनियर यापूर्वी पाकिस्तान अ संघाकडून खेळला आहे आणि २०१७ आणि २०१९ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतला आहे. त्याने स्वान्स क्रिकेटशी दोन वर्षांचा करार केला होता आणि तो ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक लीग क्रिकेटमध्ये खेळत होता.

मोहम्मद इरफान ज्युनियरवर पाच सामन्यांची बंदी

माध्यमांच्या वृत्तानुसार, पंचांनी आरोप केला आहे की इरफान ज्युनियरने चेंडू सीमारेषेवर चुकीच्या पद्धतीने घासला ज्यामुळे चेंडूला नुकसान झाले. पंचांनी हे प्रकरण चौकशीसाठी पाठवले आणि त्यानंतर लेव्हल ३ उल्लंघनासाठी त्याला पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली.

तो दोषी आढळला नसला तरी त्याला दंड ठोठावण्यात आला. त्याच्या अडचणी वाढतील की काही सामन्यांमध्ये तो मैदानात परतेल हे पाहणे बाकी आहे.

Cricketer Banned
Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

काही वर्षांपूर्वी ६ फूट ६ इंच उंचीचा हा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज स्थानिक क्लब क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. दमदार वेग, आक्रमक वृत्ती आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने तिथल्या क्रिकेट वर्तुळात आपली ओळख निर्माण केली. त्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन स्थानिक स्पर्धांमध्ये त्याला नियमित संधी मिळू लागली.

२०२० मध्ये मात्र त्याच्या कारकिर्दीत मोठा वळण आलं. गोलंदाजी शैली आणि कबड्डी-स्टाईल विकेट सेलिब्रेशनसाठी ओळखला जाणारा मोहम्मद इरफान ज्युनियर दक्षिण पंजाबच्या पहिल्या इलेव्हनमध्ये दुर्लक्षित झाल्यानंतर केवळ २५ व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सतत दुर्लक्ष आणि मर्यादित संधींमुळे निराश झालेल्या इरफानने शेवटी क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

Cricketer Banned
Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

एका स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या अनेक वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि सांगितले की, "मी गेल्या काही सिझनमध्ये सतत विकेट घेतल्या, पण तरीही मला पहिल्या इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही. नवीन खेळाडूंना संधी देत आहेत. म्हणूनच मी सर्व प्रकारचे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे." नंतर इरफान ज्युनियरने ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सबर्ब्स डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लब (WSDCC) सोबत करार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com