Modi US Visit: पाकिस्तान, चीनला आता धडकी भरणार, भारताचा अमेरिकेसोबत महत्त्वाचा संरक्षण करार

करारांतर्गत जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) फायटर जेट इंजिन तयार करतील.
Fighter Jet Tejas
Fighter Jet TejasTwitter
Published on
Updated on

Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान दोन्ही देशात अनेक महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत. यापैकी एका करारातून भारताला एक शक्तिशाली आणि घातक जेट इंजिन मिळणार आहे.

अमेरिकेची जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारांतर्गत जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) फायटर जेट इंजिन तयार करतील.

अमेरिकन GE एरोस्पेसच्या अत्याधुनिक F414 इंजिनांचीही संयुक्तपणे निर्मिती केली जाईल. भारतीय हवाई दलाला या करारामुळे अधिक बळ मिळणार असून ते तांत्रिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहे.

विशेष बाब म्हणजे F414 इंजिन गेल्या तीस वर्षांपासून यूएस नेव्हीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या फ्लाइट जेट्समध्ये हे इंजिन बसवण्यात आले आहे, त्यांनी आतापर्यंत 50 लाख तासांपेक्षा जास्त उड्डाण केले आहे. म्हणजे अंतर जास्त, शक्तीही जास्त आणि तंत्रज्ञानही खूप नवीन आहे. या जेट इंजिनची खास गोष्ट म्हणजे ते एकावेळी 98 किलोन्यूटन पॉवर जनरेट करू शकते.

Fighter Jet Tejas
बर्लिनमध्ये गोव्याची 'पॉवरफुल' कामगिरी; ज्या स्पर्धेसाठी आधी नाकरला होता व्हिसा, त्याच स्पर्धेत सियाने पटकावले 4 पदक

याशिवाय, यात असलेल्या कूलिंग सिस्टममुळे इंजिन दीर्घकाळ मजबूत आणि ठीक राहते. त्यामुळे भारताला या कराराचा फायदाच होणार आहे. सध्या 8 देश आहेत जेथे F414 इंजिन सक्रियपणे वापरले जात आहे. आता या यादीत भारताचेही नाव जोडले जाणार आहे.

भारत सध्या अनेक प्रादेशिक धोक्यांनी वेढलेला आहे. एकीकडे पाकिस्तानसारखा शेजारी देश आहे, तर दुसरीकडे चीनशी दीर्घकाळापासून सीमावाद सुरू आहे. या कारणास्तव, भारताच्या लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे.

याशिवाय भारताच्या तेजस मार्क 2 ला देखील अत्याधुनिक इंजिनची गरज आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतच्या या करारामुळे भारताला नवी शक्ती तर मिळेलच, पण इतर देशांवरील अवलंबित्वही काही प्रमाणात कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com