बर्लिनमध्ये गोव्याची 'पॉवरफुल' कामगिरी; ज्या स्पर्धेसाठी आधी नाकरला होता व्हिसा, त्याच स्पर्धेत सियाने पटकावले 4 पदक

भाटी-सांगे येथील सिया हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णांसह एकूण चार पदके पटकावली आहेत.
Goa's Siya Sarode wins 2 golds At World Games
Goa's Siya Sarode wins 2 golds At World GamesDainik Gomantak
Published on
Updated on

Siya Sarode: जर्मनीतील बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिंपिक जागतिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या सिया सरोदे आणि तानिया उसगावकर यांनी बुधवारी अभिमानास्पद कामगिरी बजावली. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोमंतकीय खेळाडूंनी आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशी एकूण सहा पदके जिंकली आहेत.

भाटी-सांगे येथील सिया हिने पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णांसह एकूण चार पदके पटकावली आहेत. विशेष म्हणजे सियाला पहिल्यांदा जर्मनीचा व्हिसा नाकारण्यात आला होता.

सिया सरोदेने डेड लिफ्ट आणि स्क्वॅट प्रकारात सुवर्ण, तर कंबाईंड प्रकारात रौप्य आणि बेंच प्रेस प्रकारात ब्राँझपद मिळविले. राज्याचे समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सियाचे कौतुक करताना ही कामगिरी गोमंतकीय आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

गोव्याची ॲथलिट गीतांजली नागवेकर हिने मंगळवारी सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत गोव्याचे 13 ‘स्पेशल’ क्रीडापटू सहभागी झाले आहे.

डिचोली येथील तानिया उल्हास उसगावकरने रोलर स्केटिंगमधील 30 मीटर स्ट्रेट लाईन प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. सुर्ल-पाळी येथील देऊळवाडा येथे राहणारी तानिया केशव सेवा साधना केंद्राची विद्यार्थिनी आहे.

Goa's Siya Sarode wins 2 golds At World Games
कळंगुट, धारगळ, रूमडामळ तणाव आणि G20 बंदोबस्त; गोवा पोलीस स्पायडरमॅनच्या भुमिकेत?

सियाला पहिल्यांदा नाकारला जर्मनीचा व्हिसा

सियाचे या स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न कदाचित हुकले असते, याचे कारण असे की तिला पहिल्यांदा जर्मनीचा व्हिसा नाकारण्यात आला. कागदपत्रांची पुरतता झाली नसल्याने तिचा व्हिसा नाकारण्यात आला होता. दरम्यान, त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेतली व सियाला वेळेत कागदपत्रे मिळाली.

सियाच्या आईचे निधन झाले असून, तिचे वडिल बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे सियाचे पालन तिचे काका करतात. दरम्यान, तिला व्हिसासाठी कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र हवे होते. मुख्यमंत्र्यांनी वेळेत केलेल्या हस्तक्षेपामुळे सियाला तात्काळ हे प्रमाणपत्र मिळाले. स्पर्धा सुरू होण्याच्या 24 तासांपूर्वी सियाला व्हिसा मिळाला. आणि सियाने दोन सुवर्णांसह एकूण चार पदके जिंकत कौतुकास्पद कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com