9 Years of Modi Government: मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्षे झाली आहेत. या 9 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासाठी कायदा असेल किंवा जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करायचा असेल यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
तसेच मोदी सरकारने देशाच्या संरक्षण क्षेत्राबाबत घेतलेल्या निर्णयामध्ये मतभेद होते. ज्यामुळे अनेक मोठे बदल दिसून आले. या 9 वर्षात पंतप्रधान मोदींनी (PM Modi) संरक्षण क्षेत्राबाबत अनेक खास निर्णय घेतले. चला तर मग जाणून घेऊया ते खास निर्णय कोणते आहेत.
संरक्षण बजेट
गेल्या 9 वर्षांत संरक्षण बजेटमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. यावरून देशाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार किती कटिबद्ध आहे, याचा अंदाज येऊ शकतो. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण, संपादन, संशोधन आणि विकासासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
संरक्षण खरेदी
देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार सध्या आधुनिक शस्त्रे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहे. त्यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादनावरही भर दिला जात आहे.
त्यानुसार संरक्षण खरेदीची संपूर्ण प्रक्रिया आयोजित केली जात असून फक्त आयातीवरच अवलंबून न राहता देशातच संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी, संरक्षण खरेदी प्रक्रिया (DPP) आणि मेक इन इंडिया (Make In India) उपक्रमावर भर देण्यात आला.
संरक्षण मॅन्युफैक्चरिंग
देशांतर्गत संरक्षण मॅन्युफैक्चरिंगला चालना देण्यासाठी मेक इन इंडिया आणि धोरणात्मक भागीदारी मॉडेल सारख्या उपक्रमांचा वापर केला जात आहे. याशिवाय संरक्षण मॅन्युफैक्चरिंगमध्ये सहभागी होण्यासाठी खाजगी क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. तर थेट परकीय गुंतवणूक वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
संरक्षण आधुनिकीकरण
गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. यासाठी, लढाऊ विमाने, पाणबुड्या, तोफखाना यंत्रणा, हेलिकॉप्टर आणि मिसाइल डिफेंस सिस्टम यांच्या खरेदीसह अनेक मोठे संरक्षण करार आणि अधिग्रहण निश्चित केले गेले आहेत.
संरक्षण मुत्सद्देगिरी
गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने संरक्षण मुत्सद्देगिरीवर बरेच लक्ष केंद्रित केले गेले आहे. या अंतर्गत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय लष्करी सराव, संरक्षण संवाद आणि तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे भारताचे अनेक देशांशी संरक्षण संबंध दृढ झाले आहेत.
बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर
भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमा यासारख्या संवेदनशील भागांवर मोदी सरकारने विशेष लक्ष दिले आहे.
सीमारेषेवरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी रस्ते, पूल, बोगदे आणि आधुनिक सर्विलंस सिस्टम तयार केली जात आहे.
संरक्षण सुधारणा
संरक्षण दलांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी सरकारने संरचनात्मक सुधारणा सुरू केल्या आहेत. या अंतर्गत, एकसंध लष्करी कमांड स्थापन करणे, तिन्ही सेवांमधील संयुक्तता आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे आणि नवीन संरक्षण सिद्धांतांकडे वाटचाल करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
डिफेंस टेक्नोलॉजी एंड इनोवेशन
देशाला स्वावलंबी बनवण्यात सरकार प्रयत्नशील असून देशांतर्गत संरक्षण तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातही नावीन्यपूर्णतेला चालना देण्यावर भर दिला आहे. या अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये सुधारणा आणि खाजगी क्षेत्रांच्या सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या सर्व गोष्टी मोदी सरकारच्या मागील 9 वर्षांच्या कालावधीत करण्यात आल्या असून यामध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.