Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुड़की परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली.
Uttarakhand Crime
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुड़की परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. येथे तीन नराधमांनी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तिला एका खोलीच्या छतावरुन खाली फेकून दिले. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली असून गावकऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलिसांवर दबाव वाढवला आहे.

नेमकी घटना काय?

दरम्यान, ही घटना हरिद्वारच्या पथरी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच एका तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीला (Girl) काहीतरी काम असल्याचे सांगून आपल्या बाईकवर बसवले. तो तिला घेऊन एका निर्जन ठिकाणी, एका गोठ्याजवळ असलेल्या खोलीत गेला. तिथे आधीच त्याचे आणखी दोन साथीदार उपस्थित होते.

Uttarakhand Crime
Uttarakhand Gold Cup: जम्मू-काश्मीरविरुद्ध गोवा ढेपाळला, उत्तराखंड क्रिकेट स्पर्धेत 73 धावांनी पराभूत; फलंदाजांची हाराकिरी

तिथे तिन्ही तरुणांनी मिळून त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीला बाईकवर घेऊन जाताना काही गावकऱ्यांनी आरोपींना पाहिले. त्यानंतर ते त्यांचा पाठलाग करत त्या खोलीपर्यंत पोहोचले. गावकऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच आरोपींनी घाबरुन मुलीला खोलीच्या छतावरुन खाली फेकून दिले आणि तिथून पळ काढला.

गावकऱ्यांचा संताप आणि पोलिसांची कारवाई

गावकऱ्यांना पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेली आढळली. त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या घटनेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शनिवारी उशिरा सायंकाळी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह फेरुपुर चौकीवर मोर्चा काढला. त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

Uttarakhand Crime
Uttarakhand Gold Cup: जम्मू-काश्मीरविरुद्ध गोवा ढेपाळला, उत्तराखंड क्रिकेट स्पर्धेत 73 धावांनी पराभूत; फलंदाजांची हाराकिरी

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पथरी पोलिसांनी (Police) या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला असून, त्यांना लवकरच अटक केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com