West Bengal: डॉक्टरांचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर, जिवंत बाळाचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र; कुटुंबीय...

West Bengal: पश्चिम बंगालमधील एका सरकारी रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे.
Child
ChildDainik Gomantak

West Bengal: पश्चिम बंगालमधील एका सरकारी रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. येथे डॉक्टरांनी नवजात बालक जिवंत असतानाच मृत्यू प्रमाणपत्र जारी केले. बालकाचा श्वासोच्छवास सुरु असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु होती.

ही घटना पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सरकारी घाटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा खातून नावाच्या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा डॉक्टरांनी (Doctors) ती मुदतपूर्व असल्याचे सांगितले. त्यानंतर तीन तासांनंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.

दरम्यान, कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी गेले असता त्याचा श्वासोच्छवास सुरु असल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब मुलाला घेऊन घाटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले, मात्र काही वेळाने मुलाचा मृत्यू झाला.

मुलावर उपचार केले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाचा मृत्यू झाला नसून त्याचा 'हत्या' झाली आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे त्याला जीव गमवावा लागला.

Child
West Bengal Politics: बंगाल हिंसाचारावर अमित शहांचं मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये, ममता सरकारकडे...

कुटुंबामध्ये रोष

दुःखी कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाला पुन्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरु करण्यात आले. रविवारी सकाळी त्याचे निधन झाले. या घटनेनंतर पीडित कुटुंब आणि गावातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, अनेक तास मुलाला डॉक्टरांनी पाहिले नाही, त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. रुग्णालयातच योग्य उपचार दिल्यास त्याचे प्राण वाचू शकले असते.

Child
West Bengal Viral News: धक्कादायक! तीन मुलांची आई मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरूणासोबत गेली पळून

तपासासाठी पथक तयार केले

या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना माहिती देणार असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणाला शिक्षा व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या सीएमओचीही भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे.

निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन कुटुंबाला देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com