Mini Goa in MP: मध्यप्रदेशातील चंबळच्या किनाऱ्यावर गोव्याची अनुभूती; 'मिनी गोवा' पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षणाचे केंद्र

पावसाळ्यात होते पर्यटकांची मोठी गर्दी
Mini Goa in MP
Mini Goa in MPDainik Gomantak
Published on
Updated on

Mini Goa in Madhya Pradesh: गोवा हे देशविदेशातील पर्यटकांचे आवडीचे पर्यटनस्थळ आहे. गोव्याचा निसर्ग, गोव्याचे सुंदर किनारे... असे विलोभनीय दृश्य इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.

त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'मिनि गोवा' उभारण्याचे प्रयत्न सुरू असतात. मध्य प्रदेशातील असाच एक मिनी गोवा सध्या पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात चंबळ नदीच्या काठावर वसलेले कानवाला नावाचे गाव आता मिनी गोवा म्हणून नावारूपाला आले आहे. या ठिकाणचा सूर्यास्त आणि निसर्ग संपदेमुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. याशिवाय पावसाळ्यातही येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

Mini Goa in MP
Goa Police Crime News: धक्कादायक! पोलिसाकडूनच महिलेचा पाठलाग; पतीलाही दिली धमकी

कानवाला गावात चंबळ बीच आहे. हा भाग मिनी गोवा म्हणून ओळखला जातो. येथे चंबळचा किनारा इतका विस्तीर्ण आहे की नदीची दुसरी बाजू पाहणे शक्य नाही, त्यामुळे जणू समुद्राचाच अनुभव येतो. या मिनी गोव्यात 2 मोठे खडक आहेत, जे नदीच्या मध्यभागी एखाद्या बेटासारखे दिसतात.

जरी लोक 12 महिने येथे येत असले तरी स्थानिक लोकांच्या मते जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येथे पर्यटकांची संख्या वाढते. नदीतील पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि काठावर उसळणाऱ्या लाटा हे त्याचे कारण आहे. लोक हे मनमोहक दृश्य बघत राहतात.

हे एक अतिशय शांत ठिकाण आहे, जिथे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येऊ शकतो. येथे तुम्ही तळ ठोकून दुपारी मुक्काम करू शकता आणि चंबळ नदीच्या काठावर कोसळणाऱ्या लाटा पाहू शकता.

Mini Goa in MP
Crocodile at Goa Raj Bhavan: राजभवनात आढळली 8 फुटी मगर; राज्यपालांच्या देखरेखीखाली वन विभागाने घेतली ताब्यात

मंदसौर जिल्ह्यातील गांधी सागरनंतर हे पर्यटन क्षेत्र आता पिकनिक स्पॉट बनले आहे. मिनी गोवा मंदसौरपासून 145 किलोमीटर अंतरावर आहे. कानवालाला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे कोटा, इंदूर किंवा उदयपूर आहे.

तर मंदसौर, सुवासरा आणि शामगढ ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. मंदसौरहून तुम्ही बस किंवा टॅक्सीनेही 'मिनी गोवा' गाठू शकता. तथापि, अद्याप हे स्थळ पुर्णतः पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले नाही. त्यामुळे येथे खाणे, पिणे, खरेदी आदी सुविधा सध्या उपलब्ध नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com