Crocodile at Goa Raj Bhavan: गोव्याच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात बुधवारी 8 फुट लांबीची मगर आढळून आली. मार्श क्रोकोडाईल या प्रकारातील ही पूर्ण वाढ झालेली मगर होती. याची माहिती मिळताच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या कार्यालयाकडून तत्काळ वनविभागाला सूचित करण्यात आले.
त्यानंतर वनविभागाचे एक पथक तत्काळ राजभवनात आले. यावेळी राज्यपाल श्रीधरन यांच्या देखरेखीखालीच या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले. तसेच टेम्पोतून ही मगर येथून नेण्यात आली. ही मगर आता सुरक्षित अधिवासात सोडली जाणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो देखील उपस्थित होते. राज्यसभेचे माजी खासदार लुईझिन फालेरो यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी पिल्लई यानी स्वतः लिहिलेले हेरिटेड ट्रीज ऑफ गोवा हे पुस्तक फालेरो यांना भेट दिले.
फालेरो हे पुर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर गत विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना तृणमूल काँग्रेसने राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्तही केले होते.
तथापि, विधानसभा निवडणुकीत तृणमूलला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर अलीकडच्या काळात फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.