Watch Video: गळ्यात रायफल लटकवून रस्त्यात डान्स, हवेत गोळीबार; दारूच्या नशेत झिंगाट व्यक्तीचा राडा

या व्हिडिओमध्ये त्याचे काही सहकारी हातात दारू घेऊन व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.
Ghaziabad's Elevated Road
Ghaziabad's Elevated RoadDainik Gomantak

गाझियाबाद एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यात एक व्यक्ती रायफल घेऊन नाचताना दिसत आहे. कारमध्ये बसून ही व्यक्ती सर्वात आधी बंदुकीत गोळी भरते. त्यानंतर तो कारच्या खिडकीतून बंदूक काढतो आणि गोळीबार हवेत करू लागतो.

हा व्यक्ती इतर काही साथीदारांसह, तो एलिव्हेटेड रोडवर आपली कार थांबवतो. याठिकाणी तो आधी रस्त्यावर दारू पितो आणि नंतर टँकवर नाचू लागतो.

Ghaziabad's Elevated Road
Bomblast In Pakistan: पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट, क्वेट्टा शहरात स्फोटामुळे अनेक जण जखमी

या व्हिडिओमध्ये त्याचे काही सहकारी हातात दारू घेऊन व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या वाहनाची माहिती घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात हे सर्व लोक ज्या वाहनातून प्रवास करत होते ते राजा चौधरी नावाच्या व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो चिरंजीव विहार येथील रहिवासी आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेसाठी शोधाशोध सुरू आहे.

Ghaziabad's Elevated Road
Chat GPT च्या क्रांतीमुळे नोकऱ्या धोक्यात! अनेकांना का सतावत आहे ही भीती? जाणून घ्या सविस्तर

मागील वर्षी डिसेंबरमध्ये एका व्यक्तीला एलिव्हेटेड रोड अडवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यादरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हायवेवर आपली कार थांबवून दोन महिलांसोबत डान्स करताना दिसत होता. त्यामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com