Chat GPT च्या क्रांतीमुळे नोकऱ्या धोक्यात! अनेकांना का सतावत आहे ही भीती? जाणून घ्या सविस्तर

इंटरनेटच्या इतिहासात सर्वात वेगाने वाढणारे हा प्लॅटफॉर्म आहे.
Chat GPT
Chat GPTDainik Gomantak
Published on
Updated on

जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे आणि नवीन शोधांमुळे अनेक कामं सुलभ होत आहेत. दरम्यान, चॅटजीपीटीच्या शुभारंभामुळे खळबळ निर्माण झाली आहे. एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले चॅटबॉट चॅटजीपीटी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झाले आहे, आणि केवळ 2 महिन्यांत, त्याच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 100 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.

इंटरनेटच्या इतिहासात सर्वात वेगाने वाढणारे हा प्लॅटफॉर्म आहे. इतकी प्रचंड लोकप्रियता आणि यश असूनही, ChatGPT बद्दल खळबळ निर्माण झाली आहे. कारण त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे मानले जात आहे.

ChatGPT तंत्रज्ञान, मीडिया, कायदेशीर, बाजार संशोधन, शिक्षक, ग्राहक सेवा, ग्राफिक डिझायनर, फायनान्स नोकऱ्या आणि स्टॉक मार्केटशी संबंधित काही नोकऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. सध्या नोकऱ्यांवर फारसा धोका दिसत नसला तरी भविष्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. पण, वास्तविक ChatGPT ला काही मर्यादा आहेत.

ChatGPT म्हणजे काय?

ChatGPT (चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) अॅप्लिकेशन ही एक मशीन लर्निंग सिस्टम आहे जी डेटाच्या आधारे संशोधन करून उत्तरे आणि माहिती देते. मात्र, या अॅप्लिकेशन मानवांसारखी बुद्धी नाही आणि ते केवळ उपलब्ध डेटाच्या आधारे माहिती तयार करते. पण, आगामी काळात त्याचा झपाट्याने विकास आणि वापर होणार असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

Chat GPT
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! होळीपूर्वी 'इतक्या' टक्क्यांनी वाढू शकतो महागाई भत्ता

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ऑटोमेशनमुळे 2025 पर्यंत 97 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण होतील. दरम्यान, ChatGPT चे AI अतिशय मानवी रीतीने आणि विक्रमी वेळेत प्रॉम्प्ट्स आणि प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम असल्याने अनेकांच्या नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीती वाढत आहे.

मात्र, रोबो मानवी नोकऱ्यांवर गदा आणत आहे. या विचारातून बाहेर पडण्याची गरज असल्याचे एका जागतिक सल्लागार संस्थेने म्हटले आहे.

Chat GPT
PM Kisan: शेतकऱ्यांना मोठा झटका, सरकारने केले नाही 'हे' काम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com