Story Of Samosa Singh: मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली, समोसा विकून नवरा बायको कमावतायेत लाखो रुपये

Story Of Samosa Singh: समोसा हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता आहे, खेड्यापासून शहरापर्यंत, श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडतो.
Samosa
SamosaDainik Gomantak
Published on
Updated on

Story Of Samosa Singh: समोसा हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता आहे, खेड्यापासून शहरापर्यंत, श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना हा नाश्ता आवडतो.

पोट भरण्यासोबतच समोसा तुमचा खिसाही भरतो. गरमागरम समोसा विकून तुम्ही लाखोंची कमाई करु शकता. विश्वास बसत नसेल तर निधी आणि शिखर वीरची संघर्षमय कहाणी वाचा.

दरम्यान, समोसे विकून या पती-पत्नीने करोडो रुपये कमावले. समोसे विकून हे दाम्पत्य दररोज 12 लाख रुपये कमावत आहे. दर महिन्याला हे जोडपे 30000 हून अधिक समोसे विकते.

आज दिल्ली, मुंबईसह (Mumbai) देशातील अनेक शहरांतील लोकांना त्यांच्या समोशांचे वेड लागले आहे. मात्र, समोसा सिंहची सुरुवात आव्हानांनी भरलेली होती.

त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या स्वप्नातील घर विकले. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या संघर्षाची कहाणी...

Samosa
Video: 'गौतमदास', 'चायवाला', काँग्रेसच्या टीकेला भाजपचे 'मुझे चलते जाना है...' उत्तर ; मोदींचा व्हिडिओ केला शेअर

समोसा सिंहची कहाणी कशी सुरु झाली

निधी सिंह आणि शिखर वीर सिंह यांची कुरुक्षेत्र येथील महाविद्यालयात (College) भेट झाली. दोघांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी-टेक केले. शिक्षणानंतर निधीला गुरुग्राममध्ये खाजगी नोकरी लागली. दोघेही कॉर्पोरेट नोकरीत होते आणि चांगले काम करत होते.

शिखर हे बायोकॉनचे प्रमुख शास्त्रज्ञ होते. शिखरला आधीपासूनच खाद्य संस्कृतीची वेड होते. एके दिवशी अचानक त्याच्या मनात आले की, स्वतःचे काहीतरी सुरु केले पाहिजे.

शिखरला आधीपासूनच समोसे विकण्याचा व्यवसाय करायचा होता, पण निधीची इच्छा होती की, त्याने आपले शिक्षण पूर्ण करावे. पण एके दिवशी निधीने एका मुलाला फूड कोर्टमध्ये समोसे खाण्यासाठी रडताना पाहिले तेव्हा तिला समजले की, लोकांमध्ये या स्नॅकची क्रेझ आहे.

निधी सुरुवातीला थोडी घाबरली, पण नंतर तीही तिच्या नवऱ्यासोबत आली. दोघांनीही नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. निधीने 30 लाखाच्या पॅकेजची नोकरी सोडली आणि 2016 मध्ये बंगळुरुमध्ये समोसा सिंहची (Samosa Singh) सुरुवात केली.

Samosa
UP: 'आशिक हूं मैं, कातिल भी...' नवरदेवाच्या या डायलॉगवर नवरीने केला लग्नास नकार

तसेच, निधी आणि शिखरने बचत केलेल्या पैशातून समोसा सिंहची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एका छोट्या दुकानातून समोसे आणि स्नॅक विकायला सुरुवात केली.

विक्री वाढू लागल्यावर त्यांना मोठ्या स्वयंपाकघराची गरज भासू लागली. किचनसाठी मोठी जागा हवी होती. दुसरीकडे, पैसेही शिल्लक नव्हते.

दोघांनीही आपला फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला. त्यांचा फ्लॅट 85 लाखांना विकला गेला, ज्यानंतर त्यामधून आलेले पैसे त्यांनी आपल्या व्यवसायात वापरले.

समोसा सिंहंची उलाढाल

समोसा सिंहची सुरु करताना या दोघांसमोर अनेक खडतर आव्हाने आली. मात्र, अखेर दोघांची मेहनत फळास गेली. काही दिवस आणि महिन्यांतच त्यांचा व्यवसाय वेगाने वाढला. आज ते दर महिन्याला सुमारे 30,000 समोसे विकतात. त्यांची उलाढाल 45 कोटी आहे. पती-पत्नी दोघे मिळून दररोज 12 लाख रुपये कमावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com