UP: 'आशिक हूं मैं, कातिल भी...' नवरदेवाच्या या डायलॉगवर नवरीने केला लग्नास नकार

UP: फिल्मी स्टाइलने वेगवेगळे डायलॉग म्हणायला सुरुवात केली.
Marraige
MarraigeDainik Gomantak

UP: आजकाल हटके पद्धतीनं लग्न करण्याला मोठे प्राधान्य दिले जात आहे. आता असंच एक लग्न समोर आले आहे. मात्र नवरदेवाचे हटके पद्धतीनं व्यक्त होण त्याला महागात पडले आहे.

ही घटना आहे उत्तरप्रदेशाच्या मऊ जिल्ह्यातील. येथील एका लग्नात नवरदेव लग्नाच्या मध्येच स्टेजवर जाऊन फिल्मी स्टाइलने वेगवेगळे डायलॉग म्हणायला सुरुवात केली.

त्याच्या नातेवाईकांनी त्याला 3 तास समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने काहीही ऐकण्यास नकार दिला. याशिवाय त्याने शिवीगाळदेखील केला आहे. वधूपक्षाला मुलाला काहीतरी मानसिक आजार हे समजताच आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलवल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडीलांनी हे लग्न मोडले आहे. लग्नात झालेला खर्च मुलीच्या घरच्यांनी परत मिळवून देण्याचे आश्वासन पोलिसांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com