Video: पोलिसच निघाला चोर! इकडं-तिकडं बघत दुकानातून चोरल्या कपड्याच्या बॅग, CCTV मध्ये कारनामा कैद; व्हिडिओ व्हायरल

Meerut Police Theft: मेरठच्या हापूर स्टेशनमधील भगतसिंग मार्केटमध्ये तैनात असलेल्या एका पोलिसावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.
Meerut Police Theft Video
Meerut Police Theft VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Meerut Police Theft: उत्तर प्रदेशातील मेरठमधून पोलिसांना लाजवेल असा एक प्रकार समोर आला आहे. येथे मेरठच्या हापूर स्टेशनमधील भगतसिंग मार्केटमध्ये तैनात असलेल्या एका पोलिसावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दुकानातून चोरी करताना स्पष्ट दिसत आहेत. एसएसपींनी या प्रकरणात कारवाई करत आरोपी उपनिरीक्षकाला तडक निलंबित केले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंग मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात ही चोरीची घटना घडली. दुकानात सामानाने भरलेल्या काही बॅग ठेवण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, गणवेशातील एक पोलिस (Police) दुकानाबाहेर उभा आहे, तिथे ठेवलेल्या बॅगवर तो लक्ष ठेवून आहे. संधी मिळताच तो एक-एक करुन चार बॅग उचलतो आणि तेथून निघून जातो. चोरी केल्यानंतर हे महाशय गुपचूप घटनास्थळावरुन पळून गेल्याचे सांगितले जाते.

Meerut Police Theft Video
Viral Video: आरं याला कुणीतरी सांगा...! मगरींनी भरलेल्या नदीतून पठ्ठ्याचा होडी प्रवास; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही थरथर कापाल

सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरीचा खुलासा

दुकानदाराने संध्याकाळी स्टॉक तपासला तेव्हा काही वस्तू गायब असल्याचे आढळून आले. संशय आल्याने दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले, त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. दुकानदाराने तातडीने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर सर्व व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एसपी सिटी यांची भेट घेतली. आता तपास अजून बाकी आहे. तपासात हे देखील पाहायचे आहे की, आरोपी पोलिसाने माल चोरला आहे की त्याचे पैसे दिले आहेत.

Meerut Police Theft Video
Viral Video: "होमवर्क जमणार नाही, आम्हाला मारा पण मुलाचे मार्क कापू नका" अभ्यासाला कंटाळून वडिलांनी जोडले हात

एसएसपींनी आरोपी उपनिरीक्षकाला निलंबित केले

यासोबतच, इतर अनेक पैलूंच्या माध्यमातून तपास सुरु आहे. एसपींनी या प्रकरणाची दखल घेतली. या प्रकरणाचा तपास मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंग यांच्याकडे सोपवला. त्यांनी दोन्ही पक्षांना बोलावून त्यांची चौकशी केली. आरोपी उपनिरीक्षकाचा चोरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एसएसपींनी त्याला निलंबित केले. आरोपी उपनिरीक्षकाची ओळख सुमित अशी झाली असून तो मेरठ ट्रॅफिक पोलिसात तैनात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com