क्रिकेट स्टेडियमनंतर आता मोदींच्या नावाने मेडिकल कॉलेज, Gujarat मध्ये जय्यत तयारी

Prime Minister Narendra Modi: अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) ने मणिनगर येथील मेडिकल कॉलेजला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi: गुजरातमधील क्रिकेट स्टेडियमला ​​'नरेंद्र मोदी' असे नाव दिल्यावर आता मेडिकल कॉलेजलाही पंतप्रधानांचे नाव देण्याची योजना समोर आली आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) ने मणिनगर येथील मेडिकल कॉलेजला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या AMC स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, एएमसी एमईटी मेडिकल कॉलेज 'एएमसी मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट' द्वारे चालवले जाते, जे एलजी हॉस्पिटल कंपाऊंडमध्ये आहे. या नामांकनाची पुष्टी करताना, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हितेश बारोट म्हणाले, “आता एएमसी संचालित एलजी कॉलेज कॅम्पसमधील एएमसी एमईटी मेडिकल कॉलेजचे नाव ‘नरेंद्र मोदी मॉडेल कॉलेज’ असे असेल.''

Prime Minister Narendra Modi
Gujarat: पतीच्या वाढत्या सेक्स डिमांडला कंटाळून वृध्द महिलेने केली पोलिसांत तक्रार

दुसरीकडे, सध्या मेडिकल कॉलेजमध्ये (Medical Colleges) एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) अभ्यासक्रम चालवले जातात. मुख्यमंत्री असताना या महाविद्यालयाची कल्पना नरेंद्र मोदी यांनीच मांडली होती. 2009 मध्ये त्यांनी त्याचे उद्घाटन केले. तेव्हा त्यात 150 जागा होत्या. आता एमबीबीएससाठी 220 जागा आणि MD/MS साठी 170 जागा आहेत.

तसेच, 14 सप्टेंबर रोजी AMC MET च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॉलेजला 'नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज' असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय एएमसीच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आला.

Prime Minister Narendra Modi
Gujarat Politics: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका, सहा आमदार होणार भाजपवासी

शिवाय, पीएम मोदी 11 वर्षांहून अधिक काळ मणिनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले. गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी डिसेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. गुजरातमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरुनही राजकारण तापू शकते, असे मानले जात आहे. स्टेडियमला ​​पीएम मोदींचे नाव दिल्याने भाजपला (BJP) विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com