लग्नावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती-पत्नीसह 5 जणांचा मृत्यू; एका निष्पाप प्राण्यानेही गमावला जीव

Mau Road Accident News: लग्नाचे वऱ्हाड घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
Mau Road Accident News
Mau Road Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

Mau Road Accident News: लग्नाचे वऱ्हाड घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून, उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील दोहरीघाट पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. रांची येथून मुलीचे लग्न आटपून गोरखपूरला परतणाऱ्या या कुटुंबाची स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन समोरुन येणाऱ्या ट्रेलरला धडकल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार इतका भयानक होता की, गाडीतील एका पाळीव कुत्र्याचाही या घटनेत अंत झाला. एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रुपांतर शोकांतिकेत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या रानीडीहा गावातील विनय श्रीवास्तव यांच्या मुलीचा विवाह रांची येथे संपन्न झाला होता. लग्नाचे सर्व सोहळे पार पडल्यानंतर हे कुटुंब स्कॉर्पिओने आपल्या मूळ गावी परतत होते. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास बरसातपुर-अहिरानी महामार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ आपली लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एका भरधाव ट्रेलरने गाडीला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावून आले, मात्र तोपर्यंत पाच जणांनी प्राण सोडले होते.

Mau Road Accident News
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

या हृदयद्रावक घटनेत 53 वर्षीय विनय श्रीवास्तव, त्यांच्या 48 वर्षीय पत्नी अर्चना श्रीवास्तव आणि 27 वर्षीय मुलगा कृतार्थ श्रीवास्तव या एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले 20 वर्षीय रवींद्र यादव आणि 28 वर्षीय पुरुषोत्तम कुमार या दोन तरुणांचाही या अपघातात अंत झाला, जे बिहारच्या (Bihar) गया जिल्ह्यातील मटीहानी गावचे रहिवासी होते. मुलीला सासरी सुखरुप पाठवल्यानंतर आई-वडील आणि भाऊ घरी परतण्यापूर्वीच काळाने त्यांना हिरावून घेतल्याने रानीडीहा गावात शोककळा पसरली.

Mau Road Accident News
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

घटनेची माहिती मिळताच दोहरीघाट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमार्टमसाठी मऊ येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. एकाच घरातील तीन पिढ्यांपैकी महत्त्वाचे सदस्य अशा प्रकारे अपघातात (Accident) गेल्याने नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून रात्रीच्या वेळी चालकाची डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com