Railway Recruitment: रेल्वे भरतीला प्रचंड प्रतिसाद! 64 हजार पदांसाठी 1.87 कोटी अर्ज

Indian railway jobs update: भारतीय रेल्वेने २०२४ मध्ये काढलेल्या ६४,१९७ पदांच्या भरतीसाठी तब्बल १.८७ कोटी अर्ज दाखल झाले आहेत.
Indian railway job applicants
Indian railway job applicantsDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने २०२४ मध्ये काढलेल्या ६४,१९७ पदांच्या भरतीसाठी तब्बल १.८७ कोटी अर्ज दाखल झाले आहेत. संसदेत रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. देशातील बेरोजगारी आणि रेल्वेच्या नोकरीची असलेली प्रचंड क्रेझ यामुळे या भरती प्रक्रियेला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे.

नोकरीची मागणी वाढली, स्पर्धाही तीव्र

गेल्या चार-पाच वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये नोकऱ्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली असून रेल्वेचे जाळे विस्तारत आहे, आधुनिकीकरण होत आहे आणि अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याशिवाय, नवीन सुरक्षा प्रणाली, विद्युतीकरण, यांत्रिकीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञान यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. यामुळे रिक्त जागांची संख्या वाढलीये.

स्पर्धेची स्थिती:

रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल (RPF): एका जागेसाठी १०७६ उमेदवार, एकूण ४५ लाखांहून अधिक अर्ज.

नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC): एका जागेसाठी ७२० उमेदवार.

टेक्निशियन: एका जागेसाठी १८९ उमेदवार.

असिस्टंट लोको पायलट (ALP): एका जागेसाठी ९८ उमेदवार.

या आकडेवारीवरून रेल्वेच्या नोकरीसाठी असलेली तीव्र स्पर्धा दिसून येते.

Indian railway job applicants
Konkan Railway: गोव्यात रेल्वेतून आलेल्या 1104 परप्रांतीयांची तपासणी! कोकण रेल्वे पोलिसांची सुरक्षा मोहिम

भरती प्रक्रिया प्रगतीपथावर, २०३५ साठी वार्षिक वेळापत्रक

रेल्वे मंत्रालयाने १.०८ लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. यापैकी ९२,११६ रिक्त जागांसाठी २०२४ मध्ये १० Centralised Employment Notifications (CENs) प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP), टेक्निशियन, RPF, ज्युनियर इंजिनिअर्स (JE) आणि पॅरामेडिकल स्टाफ यांसारख्या पदांचा समावेश आहे.

प्रगती:

५५,१९७ पदांसाठी संगणकावर आधारित पहिली परीक्षा (CBT) १५० शहरांमध्ये आणि १५ भाषांमध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे.

ALP, RPF-SI, कॉन्स्टेबल, आणि JE/DMS/CMA यांसारख्या पदांचे निकाल जाहीर झाले आहेत.

टेक्निशियन पदांसाठी १४,२९८ रिक्त जागांपैकी ९,००० हून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे.

२०२४ पासून सुरू झालेल्या वार्षिक वेळापत्रकानुसार, २०२५ साठीही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मार्चमध्ये ९,९७० ALP पदांसाठी आणि जूनमध्ये ६,२३८ टेक्निशियन पदांसाठी दोन महत्त्वाच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

पारदर्शकतेमुळे भरती प्रक्रियेत सुधारणा

२००४ ते २०१४ या काळात रेल्वेने ४.११ लाख कर्मचाऱ्यांची भरती केली होती, तर २०१४ ते २०२५ या कालावधीत ५.०८ लाख कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. यामध्ये जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांची वाढ झाली. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी वार्षिक वेळापत्रक, संगणकावर आधारित परीक्षा आणि बहुभाषिक पर्याय यांसारखे बदल करण्यात आले यामुळे पेपरफुटी किंवा गैरव्यवहार यांसारख्या घटनांना आळा बसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com