'मेकिंग इंडिया अ हब फॉर क्रूझ टुरिझम' यावर लक्ष; गोव्यात 19 जूनपासून G20 पर्यटन कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक

मेकिंग क्रूझ टुरिझम एक मॉडेल फॉर सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हल' या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.
G20
G20 PIB

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने गोव्यात 19 ते 22 जून 2023 दरम्यान चौथी जी- 20 पर्यटन कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीविषयी आज नवी दिल्ली येथे पर्यटन सचिव, व्ही. विद्यावती यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

जी- 20 पर्यटन कार्यगटाची बैठक आणि गोव्यातील पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीचा उद्देश आर्थिक विकासाला बळकटी देणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि पर्यटनाला चालना देणे तसेच प्रदेशाचा शाश्वत विकास करणे, असा असल्याचे त्यानी सांगितले.

भारताच्या जी- 20 पर्यटन क्षेत्राअंतर्गत, पर्यटन कार्य गट परस्परांशी संबंधित असलेल्या पाच प्राधान्य क्षेत्रांवर काम करत आहे. यामध्‍ये हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य, पर्यटन एमएसएमई आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटनासाठी गोवा पथदर्शी कार्यक्रम तयार करणे आणि जी- 20 पर्यटन मंत्र्यांचे घोषणापत्र तयार करणे अशा दोन प्रमुख गोष्‍टी पर्यटन कार्यगटाला करायच्या आहेत. अशी माहिती सचिव, व्ही. विद्यावती यांनी दिली.

या कार्यगटाच्या बरोबरच क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी धोरणांवर लक्ष केंद्रित करून, 'मेकिंग क्रूझ टुरिझम एक मॉडेल फॉर सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हल' या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.

G20
गोवा क्रांती दिनी काँग्रेस महागाई, बेरोजगारी विरोधात उठवणार आवाज; दोनापावल ते आझाद मैदान यात्रेचे आयोजन

या चर्चासत्रात जी - 20 सदस्य देश, आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योजक भागधारकांचा सहभाग असणार आहे. यावेळी जागतिक स्तरावर क्रूझ पर्यटनाच्या वाढीतील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली जाईल.

जी- 20 सदस्य देश आणि अतिथी देशांमधील प्रतिष्ठित वक्ते या समूह चर्चेत सहभागी होतील. क्रूझ पर्यटन, त्याचा विकास आणि क्रूझ पर्यटन शाश्वत आणि जबाबदार बनवताना आवश्‍यक असणारी धोरणे आणि उपक्रमांसह संबंधित विविध घटकांवर वक्ते प्रकाश टाकतील.

मुख्य कार्यक्रमाच्या बरोबरीने, राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचेही आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये क्रूझ पर्यटन विकसित करण्यासाठी विविध आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी 'मेकिंग इंडिया अ हब फॉर क्रूझ टुरिझम' यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

G20
OM Birla In Goa: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला गोव्यात दाखल, श्रम-धाम योजनेतील घरांचे होणार हस्तांतरण

क्रुझ पर्यटन (किनारपट्टी, बेट, प्रादेशिक आणि नौकानयन), किनारपट्टीवरील राज्यांचे दृष्टीकोन, अंतर्देशीय जलमार्गांमधील खाजगी आणि सार्वजनिक भागधारक,नद्या असलेल्या राज्यांचा दृष्टीकोन या विषयांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, उद्योग भागधारक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी होतील.

पर्यटन मंत्रालयाच्यावतीने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (यूएनडब्ल्यूटीओ) यांच्या सहकार्याने पर्यटन क्षेत्रामध्‍ये प्लास्टिकच्या चक्राकार अर्थव्यवस्थेविषयी – ‘ ग्लोबल टुरिझम प्लास्टिक इनिशिएटिव्ह' या जी-20 बैठकीला समांतर कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे, असे यावेळी पर्यटन सचिवांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com