व्हाट्स अ‍ॅपचे साइड इफेक्ट्स; बॉयफ्रेंड च्या "ओके" मेसेजनंतर 'ती'ने उचलले टोकाचे पाऊल

Madhya Pradesh Crime News: तिने वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातील समशाबाद येथे पुनर्विवाह केला होता, तेथून दहा दिवसांपूर्वीच ती गावी परतली होती.
Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Married Lady Consumed Poison after a dispute with Lover On Whatsapp:

ग्वाल्हेरच्या मोहनगढ गावात एका विवाहित तरुणीने प्रियकराशी झालेल्या वादातून विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनगड गावात राहणाऱ्या पूनम या २२ वर्षीय विवाहितेने दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. तिचे पहिले लग्न देवरा गावात झाले होते, परंतु नंतर पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती आपल्या गावी परतली.

तिने वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातील समशाबाद येथे पुनर्विवाह केला होता, तेथून दहा दिवसांपूर्वीच ती गावी परतली होती.

या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचे स्थानिक तरुणासोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ती गावात परतल्यावर, त्यांच्यात पुन्हा बोलणे सुरू झाले. यावेळी व्हॉट्सअॅपवर प्रियकराशी बोलताना तीने तिने विष प्राशन करणार असल्याचे त्याला सांगितले. तिने व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल दरम्यान विषाच्या बाटलीचा फोटोही पाठवला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रियकराने याला "ओके" असे उत्तर दिले.

Madhya Pradesh Crime News
Nuh Violence Video: मणिपूरनंतर हरियाणा पेटले! लुटमार, जाळपोळीमुळे हजारो नागरिकांनी सोडले घर

‘"ओके" असे उत्तर मिळाल्यावर या तरुणीने लगेच विष प्राशन केले. तिच्या या कृत्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान तीचा जीव वाचू शकला नाही. सुरुवातीला तिच्या नातेवाईकांनी तिला भितरवार येथे सरकारी रुग्णालयात दाखल केल आणि नंतर ग्वाल्हेरला आणले.

Madhya Pradesh Crime News
Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर; चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू, 'या' दिवशी पोहचण्याची शक्यता

मृत्यूपूर्वी या तरुणीने, प्रियकर सतत त्रास देत असल्याची तक्रारही केली होती. तिच्या मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमाकांत उपाध्याय यांनी सांगितले की, ग्वाल्हेरमध्ये विवाहित तरुणीचा मृत्यू विषारी द्रव्य प्राशन केल्याने झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व घटनाक्रम उघडकीस आणला जास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com