खालिस्तानी झेंड्यांवरून मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

जे सरकार विधानसभा वाचवू शकत नाही ते जनतेला कसे वाचवणार? : मनीष सिसोदिया
Manish Sisodia
Manish Sisodia Dainik Gomantak
Published on
Updated on

धर्मशाळा विधानसभेच्या मुख्य गेटवर खालिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याच्या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी खालिस्तानी झेंड्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Manish Sisodia slams BJP after Khalistan flag was put up on Himachal Vidhan Sabha gate)

Manish Sisodia
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरले

मनीष सिसोदिया यांनी तजिंदर सिंग बग्गा यांचे नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. संपूर्ण भाजप एका गुंडाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. जे सरकार विधानसभा वाचवू शकत नाही ते जनतेला कसे वाचवणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

मुख्य गेट आणि सीमा भिंतीवर खालिस्तानचे झेंडे

राज्यातील धर्मशाला विधानसभेच्या मुख्य गेट आणि सीमा भिंतीवर खालिस्तानचे झेंडे आढळून आले आहेत. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. एसपी शर्मा यांनी सांगितले की, ही घटना रात्री उशिरा किंवा पहाटे घडली असावी. आम्ही विधानसभेच्या गेटवरून खालिस्तानचे झेंडे हटवले आहेत. हे पंजाबमधील काही पर्यटकांचे कृत्य असू शकते. आज आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com