Manish Sisodia यांच्यावर CBI नंतर ED ची कारवाई, 8.30 तासांच्या चौकशीनंतर अटक

Manish Sisodia Arrested: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.
Manish Sisodia
Manish SisodiaDainik Gomantak

Manish Sisodia Arrested: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.

मनीष सिसोदिया यांची ईडीने गुरुवारी तिहार तुरुंगात चौकशी केली. दोन दिवसांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना ईडीने अटक केली आहे.

मनीष सिसोदिया यांची आज 8.30 तास चौकशी करण्यात आली. अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने मनीष सिसोदियांना अटक केली आहे.

सिसोदिया यांच्या अटकेवर काय म्हणाले केजरीवाल?

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ''मनीषला पहिल्यांदा सीबीआयने अटक केली. सीबीआयला कोणताही पुरावा मिळाला नाही, छाप्यात पैसे सापडले नाहीत. उद्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

काल मनीषची सुटका झाली असती तर आज ईडीने त्याला अटक केली आहे. मनीषला कोणत्याही परिस्थितीत आत ठेवणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. रोज नवनवीन खोट्या केसेस तयार केल्या जात आहेत. जनता पाहत आहे. जनताच उत्तर देईल.''

Manish Sisodia
Manish Sisodia Judicial Custody: मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

यापूर्वी, 7 मार्च रोजी ईडीने मनीष सिसोदिया यांची पाच तास चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले होते.

CBI ने आम आदमी पार्टी (AAP) नेते मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे.

तसेच, मनीष सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत. कारागृहातील सेल क्रमांक एकमध्ये कैद असलेल्या माजी उपमुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने स्थानिक न्यायालयाची परवानगी घेतली होती.

असा आरोप आहे की, 2021-22 मध्ये दारु व्यापाऱ्यांना परवाने देण्याशी संबंधित दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणामुळे दारु व्यापाऱ्यांना हातमिळवणीची संधी मिळाली आणि काही व्यापार्‍यांना फायदा झाला, ज्यांनी यासाठी लाच दिली. मात्र, आम आदमी पक्षाने (आप) हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Manish Sisodia
Manish Sisodia Bail Order: मनीष सिसोदियांच्या वाढल्या अडचणी, जामिनावर 6 मार्चला होणार सुनावणी

'आप' ने हा आरोप केला आहे

आप ने बुधवारी तिहार तुरुंगात मनीष सिसोदिया यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. आप ने आरोप केला होता की, त्यांना इतर गुन्हेगारांसोबत ठेवले जात आहे. मात्र, तुरुंग अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com