Manipur Elecion 2022: 'एन बिरेन सिंग पुन्हा होणार का मुख्यमंत्री'?

यावेळीही राज्यात भाजपचेच सरकार येणार असून आम्ही 40 जागा जिंकू आसा विश्वास व्चक्त केला.
Manipur Chief Minister N. Biren Singh.
Manipur Chief Minister N. Biren Singh.Dainik Gomantak

राज्यपाल ला गणेशन आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सोमवारी मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अर्ध्या तासात आपापल्या मतदारसंघात मतदान केले. राज्यपाल गणेशन यांनी मणिपूरच्या सर्व पात्र मतदारांना इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद मतदारसंघातील टीजी उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

“आपला देश लोकशाहीप्रधान आहे आणि निवडणुका हे लोकशाहीचे प्रतीक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त केला आहे.'' गणेशन यांना सागोलबंद मतदारसंघातून मतदार करण्यात आले आहे. सीईओने त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला EPIC (इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड) कार्ड सुपूर्द केले.

Manipur Chief Minister N. Biren Singh.
गुलाम नबी आझाद यांचा पुतण्या भाजपमध्ये! काँग्रेसला धक्का

याआधी ते चेन्नईतील त्यागराया नगर विधानसभा मतदारसंघाचे मतदार होते. मुख्यमंत्री सिंह (N. Biren Singh) आणि त्यांच्या पत्नीने इंफाळ पूर्व जिल्ह्यातील हिंगांग मतदारसंघातील 'मॉडेल' मतदान केंद्रावर मतदान केले. “यावेळी मुख्यमंत्री यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.”

पाच जिल्ह्यांतील 38 जागांवर मतदान

मणिपूर विधानसभेच्या (Assembly)पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कडेकोट बंदोबस्तात पाच जिल्ह्यांतील 38 जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. कोविड-19 चे रुग्ण दुपारी 3 ते 4 या वेळेत मतदान करतील. दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 5 मार्चला मतदान होणार असून मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

भाजपचे सरकार स्थापन होणार आणि आम्ही 40 जागा जिंकू- बिरेन सिंह

एन बिरेन सिंह 2007 ते 2016 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस (Congress) सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी करत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये काँग्रेस 60 पैकी 28 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र भाजपने एनपीपी, एनपीएफ आणि लोक जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. एन बिरेन सिंग यांनी राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळीही राज्यात भाजपचेच सरकार येणार असून 40 जागा जिंकू, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com