Manik Saha CM: माणिक साहा पुन्हा त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ते आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मार्चला शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये पीएम मोदीही सहभागी होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 32 जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान, त्रिपुरामध्ये (Tripura) विधानसभेच्या जागांची संख्या 60 आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 31 जागांची गरज आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्याचा मित्रपक्ष असलेल्या इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला एक जागा मिळाली.
42 जागा लढवणारा आदिवासी-आधारित टिपरा मोथा पक्ष 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. सीपीआय(एम)ला 11 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला (Congress) तीन जागा मिळाल्या.
तसेच, त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराची मुख्यमंत्री निवडीसाठी सोमवारी बैठक झाली. बुधवारी नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, आमदारांच्या या बैठकीत माणिक साहा यांची पुन्हा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. आगरतळा येथे झालेल्या या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांव्यतिरिक्त भाजपचे ईशान्य समन्वयक संबित पात्रा, माणिक साहा, भाजप अध्यक्ष राजीव भट्टाचार्जी आणि केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मेघालय आणि नागालँड आणि बुधवारी त्रिपुराच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, मेघालयच्या नवीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मंगळवारी सकाळी 11 वाजता शिलाँगमध्ये, तर नागालँडचा कोहिमा येथे दुपारी 1.45 वाजता होणार आहे.
तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी त्रिपुराला भेट दिली आणि सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी साहा, भौमिक आणि इतर भाजप नेत्यांची बैठक घेतली.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सरमा यांनी रविवारी दिल्लीला भेट दिली आणि शाह आणि नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्रिपुरा-नागालँडमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.