Mandous Cyclone | Mandous Cyclone News Updates
Mandous Cyclone | Mandous Cyclone News UpdatesDainik Gomantak

Mandous Cyclone चा दक्षिण भारतात कहर; हवामान खात्यानं दिला 'हा' इशारा

दक्षिण भारतात मंडोस चक्रीवादळाचा प्रभाव आता अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे.
Published on

Mandous Cyclone : दक्षिण भारतात मंडोस चक्रीवादळाचा प्रभाव आता अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. दक्षिण भारतातील आंध्रप्रदेशासह काही राज्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. किनारी भागात तामिळनाडू, पद्दुचेरी, कराईकलमध्ये विविध भागात आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिणेतील किनारपट्टीवरुल आंध्रप्रदेश आणि रायलसीमा मध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादमध्ये तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. इतकंच नाही तर हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात तापमान -3 अंशांखाली जाऊ शकतं. (Mandous Cyclone News Updates)

Mandous Cyclone | Mandous Cyclone News Updates
Goa Culture : गोव्यातील दत्तोपासनेची समृद्ध करणारी परंपरा

आंध्रप्रदेशमधील हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या खाडीवरुन मंडोस चक्रीवादळ नैऋत्य दिशेने पुढे जात आहे. 12 किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकरत असून आज 9 डिसेंबर रोजी हे वादळ बंगालच्या नैऋत्य खाडीवर घोंघावताना दिसत आहे. हे वादळ चेन्नईपासून 320 किमी वायव्येकडे तयार झालं असून ते आज रात्री महाबलीपुरम, पद्दुचेरी, श्रीहरीकोटा, उत्तर तामिळनाडूसह किनारी भागाला पार करण्याची शक्यता आहे. या काळात 85 किमी प्रतितास वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com