मध्य प्रदेशमध्ये CM सावंत यांचा डबल इंजिन सरकारचा नारा; हिंदीसह मराठीत केले भाषण

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मध्य प्रदेश राज्यातील लांजीच्या कारंजा गावाला भेट दिली.
Goa CM Pramod Sawant In MP
Goa CM Pramod Sawant In MP
Published on
Updated on

Goa CM In MP: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मध्य प्रदेश राज्यातील लांजीच्या कारंजा गावाला भेट दिली. सावंत यांनी कारंजाच्या बाळभाऊ देवरस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच, मुख्यमंत्री सावंत यांनी कारंजा चौकात उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

मुख्यंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी उपस्थितांना केंद्र सरकार व मध्य प्रदेश राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. देशात पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वप्रथम हिंदीतून जाहीर सभेला संबोधित केले. यानंतर त्यांनी हिंदीसह मराठीत संबोधित केले.

मध्यप्रदेशात स्टार प्रचारकांचा दौरा सुरूच आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर हे 05 नोव्हेंबरला दमोह दौऱ्यावर आहेत.

अनुराग ठाकूर भारतीय जनता पक्षाचे दमोह विधानसभा उमेदवार जयंत मलाय्या यांच्या समर्थनार्थ युवा मोर्चाने आयोजित केलेल्या युवा परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa Water Metro
Goa Crop Loss Compensation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com