भारतीय जनता पक्षाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण चांगलचं तापलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. ममतांनी सलग तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा मी निषेध करते.
आरोपी भाजप नेत्यांना तात्काळ अटक करावी : ममता
आणखी एका ट्विटमध्ये ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) लिहिले की, ''देशाची एकात्मता बिघडू नये आणि लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये यासाठी भाजपच्या (BJP) आरोपी नेत्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. त्याच वेळी, मी माझ्या सर्व जाती, पंथ, धर्म आणि समुदायाच्या सर्व बंधू-भगिनींना आवाहन करते की, सर्वसामान्य लोकांच्या व्यापक हितासाठी शांतता राखावी. या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.''
देशात काही झाले तर भाजप जबाबदार : राऊत
त्याचवेळी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही याप्रकरणी वक्तव्य करुन नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशात सर्व काही ठीक चालले आहे, परंतु भाजपच्या प्रवक्त्याला दोन भिन्न धर्माच्या लोकांमध्ये भांडण लावायचे आहे. देशात काही झाले तर भाजप जबाबदार असतील. ते पुढे म्हणाले, 'आम्ही आमचे काम सुरुच ठेवू... परंतु या सगळ्यास कारणीभूत असलेल्या लोकांची दखल कधी घेणार?'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.