Islamabad Blast: दिल्लीनंतर इस्लामाबाद हादरले! कोर्टाबाहेर जोरदार स्फोट तर वझिरीस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 12 ठार, 25 जखमी

Islamabad Court Parking Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथेही एका भीषण स्फोटाची घटना समोर आली आहे.
Islamabad Court Parking Blast
Islamabad BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Islamabad Court Parking Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथेही एका भीषण स्फोटाची घटना समोर आली. इस्लामाबादमधील एका जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट एका कारमध्ये झाला असून, अनेक लोक मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. इंडिया टुडेने पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 लोक जखमी झाले आहेत.

इस्लामाबादमध्ये स्फोट

दरम्यान, हा स्फोट जी-11 परिसरात असलेल्या न्यायिक संकुलाजवळ झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' (Dawn) च्या रिपोर्टनुसार, न्यायालयाच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका वाहनात सिलिंडरसारखा स्फोट झाला. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. स्फोटाचे नेमके स्वरुप आणि कारण शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. दुसरीकडे, इंडिया टुडे आणि 'समा टीव्ही' सारख्या पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालात या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याचे म्हटले. समा टीव्हीनुसार, या स्फोटाचा आवाज पोलीस लाइन मुख्यालयापर्यंत ऐकू आला, ज्यामुळे आसपासच्या भागात दहशत पसरली. स्फोटानंतर तात्काळ आपत्कालीन पथके आणि सुरक्षा दले घटनास्थळी दाखल झाली असून परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

Islamabad Court Parking Blast
India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 2 धावांनी चारली पराभवाची धूळ, रॉबिन उथप्पा विजयाचा शिल्पकार

दहशतवादी हल्ल्यांची मालिका

इस्लामाबादमधील (Islamabad) स्फोटादरम्यान, दक्षिण वझिरीस्तान येथेही दहशतवादी हल्ला झाला. वाना येथील कॅडेट कॉलेजवर झालेल्या या हल्ल्यात कार बॉम्ब आणि अनेक आत्मघाती हल्लेखोर सामील होते. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत दोन हल्लेखोरांना ठार केले, तर तीन हल्लेखोर अद्याप कॉलेजच्या आतमध्ये अडकले आहेत. या हल्लेखोरांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पाकिस्तानी लष्कराच्या डीजी आयएसपीआरने या घटनेला दुजोरा दिला, परंतु बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना टीटीपीने या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे म्हटले.

Islamabad Court Parking Blast
Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

पाकिस्तानी लष्कराचा भारतावर आरोप

दरम्यान, या दोन मोठ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराच्या माध्यम शाखेने यानी इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सने एक नवा प्रचार सुरु केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर नवा प्रोपेगंडा चालवत असलेल्या आयएसपीआरने वाना कॅडेट कॉलेजवरील बॉम्बस्फोटासाठी थेट भारतावर (India) आरोप केला. त्यांनी म्हटले की, भारत-समर्थित दहशतवाद्यांनी सोमवारी दक्षिण वझिरीस्तानच्या कॅडेट कॉलेज वानावर हल्ला केला. दिल्ली आणि इस्लामाबाद या दोन्ही राजधानींमध्ये स्फोटाच्या घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com