Mahashivratri 2025
Mahashivratri 2025Dainik Gomantak

Mahashivratri 2025: संयम, धाडस, निर्णय क्षमता! आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भगवान शंकराकडून शिका 'हे' गुण

Mahashivratri: महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे.
Published on

महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यंदा 2025 साली महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.

भगवान शंकर हे हिंदू धर्मातील सर्वांत पूजनीय देवांपैकी एक आहेत. त्यांचे जीवन, आचरण, आणि तत्वज्ञान यांच्यातून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. खाली त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत.

समानता

भगवान शिवांना कोणताही भेदभाव नाही. भक्त हा कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला ते स्वीकारतात. यावरून आपणही समाजात कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येकाला समान वागणूक द्यायला हवी.

Mahashivratri 2025
Maha Shivratri: महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा, विधी अन् शुभ मुहूर्त

त्याग आणि विरक्ती

शिवशंकर हे वैभव, संपत्ती यापासून दूर राहतात. त्यामुळे आपणही भौतिक सुखांच्या मागे न लागता अंतर्मुख होऊन समाधान शोधले पाहिजे.

संयम

भगवान शंकर यांनी आपल्या शरीरावर विष धारण केले, पण त्याचा स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. यावरून आपण संकटे आली तरी धीराने आणि संयमाने वागले पाहिजे, हे शिकता येते.

कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ सेवा

भगवान शंकर यांनी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता नेहमीच जगाच्या कल्याणाचा विचार केला. आपणही समाज आणि कुटुंबासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करायला हवे.

रागावर नियंत्रण

भगवान शंकर स्वतःला नियंत्रित ठेवतात, परंतु अन्याय सहन करत नाहीत. आवश्यकतेनुसार राग योग्य मार्गाने वापरणं शिकलं पाहिजे.

Mahashivratri 2025
Goa Budget Session: केवळ औपचारिकतेसाठीच 3 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन? सरकारवर टीकेची झोड

संकटांवर विजय मिळवण्याची क्षमता

भगवान शंकर यांनी विष पचवले आणि त्याचे रुपांतर अमृतात केले होते. यावरून आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद आणि धैर्य असायला हवे.

धैर्य आणि शांत मन

भगवान शंकर मनाने शांत आहेत. कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता शांत चित्ताने विचार करून निर्णय घ्यावा.

सौंदर्य आणि कलांचा आदर

नटराजाच्या रूपात भगवान शिव नृत्यकलेचे प्रतीक आहेत. यावरून कलांचे महत्त्व आणि सौंदर्याची कदर करण्याची शिकवण मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com