'भारताला इस्लामिक देश होण्यापासून रोखण्यासाठी...'

हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात जामिनावर सुटलेले वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद (Mahant Yeti Narasimhanand) यांच्या संघटनेने रविवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले.
Mahant Yeti Narasimhanand
Mahant Yeti NarasimhanandDainik Gomantak
Published on
Updated on

हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात जामिनावर सुटलेले वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद यांच्या संघटनेने रविवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी म्हटले की, ''हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. जेणेकरुन भारताला (India) इस्लामिक देश होण्यापासून रोखता येईल. यती नरसिंहानंद यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मथुरेत असेच वक्तव्य केले होते.'' (Mahant Yeti Narasimhanand's organization has once again made a controversial statement)

भारत हे प्रजासत्ताक आहे कारण इथे जास्त हिंदू आहेत: सत्यदेवानंद

यती सत्यदेवानंद सरस्वती हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे तीन दिवसीय 'धर्म संसद' च्या पहिल्या दिवशी म्हणाले- ''भारत हे प्रजासत्ताक आहे कारण इथे हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु मुस्लिम लोक पद्धतशीरपणे अधिक मुले जन्माला घालतायेत. त्यांचा मुख्य हेतू लोकसंख्या वाढवणे हाच आहे. त्यामुळेच आमच्या संघटनेने हिंदूंना (Hindu) अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन भारताला मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानसारखा इस्लामिक देश होण्यापासून रोखता येईल.''

Mahant Yeti Narasimhanand
Delhi Violence : चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक

सत्यदेवानंद सरस्वती यांना जेव्हा विचारण्यात आले की, अशा वक्तव्यांमुळे दोन मुले जन्माला घालण्याच्या राष्ट्रीय धोरणाचे उल्लंघन होत नाही का, तेव्हा ते म्हणाले की, ''नागरिकांना दोनच मुले जन्माला घालण्याची परवानगी देणारा कोणताही कायदा नाही.''

Mahant Yeti Narasimhanand
Delhi Violence : चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक

पोलिसांनी नोटीस बजावली

यती नरसिंहानंद, अन्नपूर्णा भारती यांच्यासह देशभरातील अनेक महंतही या सभेला पोहोचले होते. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सत्यदेवानंद सरस्वती यांना नोटीस बजावून कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध द्वेष पसरवणारी भाषा वापरु नये, असे निर्देश दिले आहेत.

पोलीस कायदा 2007 च्या कलम 64 अन्वये जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये उना जिल्ह्यातील आंब पोलीस ठाण्याचे एसएचओ यांनी नियमांचे पालन न केल्यास प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

यती नरसिंहानंद जामिनावर बाहेर

गेल्या वर्षी 17 ते 19 डिसेंबर दरम्यान यती नरसिंहानंद यांनी हरिद्वारमध्ये धर्मसंसदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. यानंतर यति नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

Mahant Yeti Narasimhanand
Video: जहांगीरपुरीला झालेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी

यानंतर त्यांनी गेल्या रविवारी दिल्लीतील बुरारी मैदानावर झालेल्या हिंदू महापंचायतमध्ये भाग घेऊन तिथे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते यावेळी म्हणाले, 'जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवले तर येत्या 20 वर्षांत 50% हिंदू धर्म स्वीकारतील.' त्यांनी हिंदूंना त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलण्याचे आवाहनही केले होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com