क्रूरता ! Madhya Pradeshतील सिंगरौलीमध्ये नराधमाने केला महिलेवर बलात्कार

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिंगरौलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशातील सिंगरौलीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इथे एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला आहे. महिलेने आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने हा जघण्य अपराध केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, 12-13 च्या रात्री ही महिला (Women) घरामध्ये आराम करत होती, अशी माहिती या भागातील पोलीस स्टेशन प्रभारींनी माध्यमांना दिली आहे. तेव्हाच या नराधमाने घरात घुसून महिलेसोबत गैरकृत्य केले. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहोचवली. यानंतर महिलेने पतीसह अन्य नातेवाइकांबरोबर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला.

Crime News
Andhra Pradesh फार्मा कंपनीला भीषण आग, एक दोघे जखमी

दुसरीकडे, सध्या पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. या घटनेबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये महिलेचे वय 35 वर्षे आणि तरुणाचे वय 30 असल्याचे सांगण्यात आले आहे. तरुणाचे महिलेवर एकतर्फी प्रेम होते. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की, काही दिवसांपूर्वी तरुणाने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र महिलेने त्यास नकार दिला. यानंतर तिच्याबरोबर हे क्रूर कृत्य करण्यात आले आहे.

Crime News
Uttar Pradesh Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार

तसेच, आरोपी तरुण हा महिलेचा शेजारी असल्याचेही समोर येत आहे. घटनेच्या वेळी महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिच्यावरही काठीने हल्ला केला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com