Kolkata: आई मी चोर नाहीये! चिप्स पॅकेट चोरीचा आरोप; 12 वर्षीय मुलाने चिठ्ठी लिहून संपवले आयुष्य

West Bengal Crime News: बराचवेळ झाल्याने मुलाच्या आईने रुमचे दार तोडून आत प्रवेश केला त्यावेळी मुलाच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले.
Kolkata, West Bengal News
Dead BodyDainik Gomantak
Published on
Updated on

आई मी चोर नाहीये, असे म्हणत १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. चिप्सचे पाकिट चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याला दुकान मालकाने उठबशा काढण्यास लावल्याचा आरोप आहे.

कृष्णेन्दु दास असे आत्महत्या केलेल्या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. पश्चिम मेडिनीपूर जिल्ह्यातील पान्सकुरा येथे ही घटना घडली. मुलाने दुकानातून चिप्सचे पॅकेट चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. यानंतर दुकानमालकाने मुलाला उठबशा करण्यास सांगितले, असा आरोप आहे. दरम्यान, दुकान मालकाने या आरोपांचे खंडन केले आहे.

Kolkata, West Bengal News
National Herald Case: काँग्रेस नेत्यांनी सोनिया आणि राहुल यांच्या कंपनीला लाखोंची देणगी दिली; ईडीचा मोठा खुलासा

पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या महितीनुसार, मुलाच्या आईला देखील घटनास्थळी बोलविण्यात आले होते. यानंतर आईने मुलाला रागवत घडलेल्या प्रकार चुकूीचा असल्याचे सांगितले होते. यानंतर मुलगा आईसोबत घरी गेला आणि त्याने एका रुममध्ये स्वत:ला कोंडून घेतले. बराचवेळ त्याने दार उघडलेच नाही.

बराचवेळ झाल्याने मुलाच्या आईने रुमचे दार तोडून आत प्रवेश केला त्यावेळी मुलाच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. मुलाच्या जवळच किटकनाशकाची रिकमी बोतल सापडली. मुलाला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले पण, त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील सर्वांनाच धक्का बसला आहे.

Kolkata, West Bengal News
Red Alert In Goa: जोर वाढणार, गोव्यात धो... धो... बरसणार; राज्याला तीन दिवस 'रेड अलर्ट'

आई मी चोर नाहीये!

"आई मी चोर नाहीये. मी चोरी केलेली नाही. मी थांबलो होतो पण काका (दुकानदार) तिथे नव्हते. मी माघारी आलो तेव्हा मला जमिनीवर कुरकुरेचे पाकीट पडलेल्या सापडले ते मी उचलले. मला कुरकुरे आवडतात," असे १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आईला लिहलेल्या चिठ्ठीत लिहले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com