National Herald Case: काँग्रेस नेत्यांनी सोनिया आणि राहुल यांच्या कंपनीला लाखोंची देणगी दिली; ईडीचा मोठा खुलासा

ED Investigat National Herald Case: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होत आहेत.
sonia gandhi and rahul gandhi
sonia gandhi and rahul gandhiDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यातच आता, सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नियंत्रणाखालील आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित असलेल्या यंग इंडियन लिमिटेड या कंपनीला देणगी देण्याचे निर्देश देण्यात आले होते, असा खुलासा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (23 मे) केला. अनेक वरिष्ठ नेत्यांनी कंपनीला लाखो रुपयांच्या देणग्या दिल्याचे वृत्त आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, यंग इंडियन लिमिटेडने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून केवळ 50 लाख रुपयांत 2000 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. 2022 मध्ये, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जे त्यावेळी आमदार होते, त्यांच्या कथित सूचनांनुसार चार काँग्रेस नेत्यांनी कंपनीला 80 लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली होती, असेही ईडीने म्हटले.

sonia gandhi and rahul gandhi
Rahul Gandhi: 'आपण भाजप, RSS आणि भारतीय राज्याशी लढतोय'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद होणार?

2019 ची लोकसभा निवडणुक लढवणारे गली अनिल कुमार यांनी जून 2022 मध्ये 20 लाख रुपये देणगी दिली होती. माजी आमदार अली शब्बीर यांनीही 20 लाख रुपये, तर तेलंगणा काँग्रेसचे तत्कालीन कोषाध्यक्ष पी सुदर्शन यांनी 15 लाख रुपये देणगी दिली होती. याव्यतिरिक्त, तत्कालीन तेलंगणा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी 25 लाख रुपये दिले होते. विशेष म्हणजे, या सर्व लोकांनी एकाच महिन्यात देणगी दिली होती.

तसेच, काँग्रेस नेते पवन बन्सल यांनी कर्नाटकचे नेते डीके शिवकुमार आणि डीके सुरेश यांना यंग इंडियाला अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी देण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. शिवकुमार यांनी एप्रिल 2022 मध्ये 25 लाख रुपये तर त्याच दिवशी त्यांचा भाऊ सुरेश यांनीही 25 लाख रुपये देणगी दिली होती. शिवकुमार यांच्याशी संबंधित असलेल्या नॅशनल एज्युकेशन ट्रस्टने 2 कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे वृत्त आहे.

sonia gandhi and rahul gandhi
Rahul Gandhi: आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर; म्हणाले, ''त्यांचा अहंकार आणि मूर्खपणा...''

दुसऱ्या एका घटनेत पंजाब विधानसभा निवडणूक लढवणारे अमित विज यांनी यंग इंडियाला तीन हप्त्यांमध्ये 3.3 कोटी रुपये दिले होते. या सगळ्या देणग्या एका वर्षाच्या आत देण्यात आल्या होत्या, असेही ईडीने सांगितले.

तर अलिकडेच झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयात सांगितले होते की, सोनिया आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 142 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या प्रकरणात गुन्ह्यातून मिळालेले एकूण उत्पन्न 988 कोटी रुपये असल्याचा दावा ईडीने केला. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) सोनिया गांधींना आरोपी क्रमांक 1 आणि राहुल गांधींना आरोपी क्रमांक 2 म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com