गुजरातमध्ये लम्पी या त्वचा रोगाचा कहर सुरू आहे. (Lumpy Skin Disease in Gujrat) राज्यातील 17 जिल्ह्यात या रोगाचा प्रसार झाला असून, जवळपास 1240 जनावरं दगावली (cattle have died) आहेत. गुजरात सरकारकडून गुरांचे सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरण करण्याला गती देण्यात आली आहे. आजवर जवळपास सहा लाख गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती राज्य आरोग्य खात्याने दिली आहे.
गुजरातमध्ये एकूण 33 जिल्हे आहेत त्यापैकी 17 जिल्ह्यात या लम्पी त्वचा रोगाचा प्रसार झाला आहे. सौराष्ट्र (Saurastra) सर्वाधिक प्रभावित झाले आहे. याशिवाय कच्छ, जामनगर, देवभूमी, द्वारका, राजकोट, पोरबंदर, मोरबी, जुनागढ, गिर सोमनाथ, बानसकांठा, पाटण, सुरत, सुरेंद्रनगर, भावनगर, अरवली, पंचमहल हे जिल्हे देखील प्रभावित झाले आहेत. रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने गुरांना एकत्र करणे, एका दुसऱ्या राज्यात, जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून बंदी घातली आहे.
लम्पी रोगामुळे दगावलेल्या गुरांना उघड्यावर फेकून देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. राज्यातील एक हजार 746 गावांमध्ये 50 हजार 328 गूरांचा इलाज करण्यात आला आहे. लम्पी हा एक संसर्गजन्य त्वचा रोग असून, मच्छर, माशी, जंतू यांच्यापासून होतो. तसेच, दुषित खाल्याने देखील हा रोग होऊ शकतो. असे तज्ञाचे म्हणणे आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.