Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

Little Girl Narrow Escape From Bus Video: हा व्हायरल व्हिडिओ आकाराने खूप लहान असला तरी त्यातील दृश्य प्रचंड थक्क करणारे आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान मुलगी अचानक धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते.
Little Girl Narrow Escape From Bus Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shocking Viral Video Road Accident: आजच्या काळात सोशल मीडिया हे आपल्या मनोरंजनाचे एक मुख्य साधन बनले आहे. या प्लॅटफॉर्मवर दररोज जुगाड, स्टंट, डान्स, भांडणे आणि लहान मुलांच्या गोड कौतुकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पण, काही वेळा सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा आणि अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

हा व्हायरल व्हिडिओ आकाराने खूप लहान असला तरी त्यातील दृश्य प्रचंड थक्क करणारे आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लहान मुलगी अचानक धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. ती मुलगी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षाच्या पुढच्या बाजूने धावत येते, त्यामुळे समोरुन येणाऱ्या बस चालकाला ती धावत येत असल्याचे अजिबात दिसत नाही. मुलगी अगदी बसच्या इतकी जवळ पोहोचते की, जर ती एक सेकंद आधी निघाली असती, तर थेट बसच्या चाकाखाली आली असती.

सुदैवाने, ती एका सेकंदाच्या फरकाने बसच्या पुढे येण्यापासून वाचते आणि कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे मागे फिरते. समोर अचानक मुलगी आल्याचे लक्षात येताच बस चालकही तातडीने ब्रेक दाबून बस थांबवतो. पण जरासा विचार केला तरी अंगावर काटा येतो की, जर मुलीला वेळत मागे फिरता आले नसते, तर या ठिकाणी एक मोठा आणि भीषण अपघात झाला असता.

Little Girl Narrow Escape From Bus Video
Viral Video: 'छोटा रोनाल्डो' इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय! चिमुकल्याच्या फुटबॉल कौशल्यानं सगळेच थक्क, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ 'एक्स' वर @itssurajprakash नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये अतिशय महत्त्वाचा संदेश देण्यात आला असून, 'एक लहानसा निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरु शकतो,' असे लिहिले.

Little Girl Narrow Escape From Bus Video
Viral Video: काय हे वेडेपण! भररस्त्यात दुचाकी चालवताना लॅपटॉपवर काम, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला असून नेटीझन्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, ही मुलगी एका अत्यंत भयंकर अपघातातून बचावली, हे केवळ आणि केवळ तिच्या पालकांच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे. दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले की, या मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे, पण कदाचित त्यांना त्यांच्या मुलीची कोणतीच चिंता नाही. तर आणखी एका युझरने या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, नक्कीच कोणत्यातरी दैवी शक्तीने या लहान मुलीचा (Girl) जीव वाचवला. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर पालकांसाठी एक धोक्याची घंटा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com