LinkedIn Survey : भारतात यंदा नोकरी बदलाची लाट, 82% कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात

Job 2025 : भारतात नोकरीचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात आहेत, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे संधी मिळत नाहीत. तंत्रज्ञानातील प्रगती, ऑटोमेशन, आणि अर्थव्यवस्थेतील बदल यामुळे नोकरीच्या संधींवर परिणाम होत आहे.
LinkedIn Survey
LinkedIn SurveyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात नोकरीचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात आहेत, पण त्यांना अपेक्षेप्रमाणे संधी मिळत नाहीत. तंत्रज्ञानातील प्रगती, ऑटोमेशन, आणि अर्थव्यवस्थेतील बदल यामुळे नोकरीच्या संधींवर परिणाम होत आहे. विशेषतः तरुण आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी ही समस्या अधिक तीव्र बनत आहे.

भारतातील ५ पैकी ४ (८२ टक्‍के) कर्मचारी यंदा नवीन रोजगार शोधण्‍याचे नियोजन करत आहेत, तसेच अर्ध्‍याहून अधिक (५५ टक्‍के) कर्मचाऱ्यांच्या मते, गेल्‍या वर्षभरात रोजगार शोधण्‍याची प्रक्रिया अधिक आव्‍हानात्‍मक झाली आहे.

भारतातील दोन-तृतीयांशहून अधिक (६९ टक्‍के) एचआर कर्मचाऱ्यांचे हेच मत आहे, ज्‍यामधून २०२५ मध्‍ये कर्मचाऱ्यांनी रोजगारासाठी अर्ज करण्‍याच्‍या व रोजगार मिळवण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये आवश्‍यक बदल करण्‍याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

LinkedIn Survey
Goa Opinion Poll Day: आणि गोवा स्वतंत्र राज्य बनले...

२०२४ मध्ये नवीन रोजगार शोधणाऱ्या पाचपैकी एक (१५ टक्के) कार्यरत कर्मचारी अजूनही नवीन संधी शोधत आहेत.आव्‍हानात्‍मक बाजारपेठेमुळे काही जणांना माघार पत्‍करण्‍यास भाग पाडले.

३७ टक्‍के कर्मचारी म्‍हणतात की, त्‍यांचे २०२५ मध्‍ये नवीन रोजगाराचा शोध घेण्‍याचे नियोजन नाही. ५८ टक्‍के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, रोजगार बाजारपेठेत सुधारणा होईल आणि त्‍यांना २०२५ मध्‍ये नवीन रोजगार मिळण्‍याची आशा आहे.

देशातील ४९ टक्‍के लोक रोजगारासाठी अर्ज करत आहेत, परंतू त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. नियोक्‍त्‍यांना देखील प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे.

एक चतुर्थांशपेक्षा जास्त (२७ टक्के) कर्मचारी दिवसाला ३ ते ५ तास अर्ज करण्यात घालवत आहेत. तर ५५ टक्के ५५ टक्‍के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, आपल्याला मिळणाऱ्या रोजगार अर्जांपैकी अर्ध्‍याहून कमी अर्ज सर्व निकषांची पूर्तता करतात.

LinkedIn Survey
Goa Startup Policy ठरली लाभदायी, राज्यात तब्बल 575 स्टार्टअप्सची नोंदणी; नव उद्योजकांना सरकारचं आर्थिक पाठबळ

करिअर तज्ञआणि लिंक्‍डइन इंडियासाठी वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ''रोजगार बाजारपेठ आव्‍हानात्‍मक आहे, पण यामधून भारतीयांना त्‍यांच्‍या रोजगार शोधाप्रती अधिक विचारशील दृष्‍टीकोन अवलंबण्‍याची गरज देखील दिसून येते. योग्‍य कौशल्‍ये आत्‍मसात करणे महत्त्वाचे आहे."

"तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल अपडेट ठेवा. तुमच्‍या कौशल्‍यांशी जुळणाऱ्या पदांवर लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक धोरणात्‍मक व जाणीवपूर्वक काम केल्‍याने तुम्‍हाला आव्‍हानात्‍मक रोजगार बाजारपेठेत देखील नवीन संधी आणि अर्थपूर्ण करिअर वाढ मिळू शकते," असं निरजिता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

नोकरी शोधणाऱ्यांना त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनाशी जुळून राहत वरचढ ठरण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन नवीन जॉब मॅच वैशिष्‍ट्य सादर करत आहे, जे त्‍यांची कौशल्‍ये व अनुभव खुल्‍या पदांसाठी कशाप्रकारे अनुकूल आहे हे दाखवते.

यामुळे त्‍यांना हव्या असलेल्‍या संधींचा शोध घेण्‍यावर फोकस करण्‍यास मदत होईल. एका क्लिकवर नोकरी शोधणाऱ्यांना त्यांनी हव्या असलेल्या नोकरीची पात्रता व संपूर्ण माहिती मिळते.

LinkedIn Survey
Government Job: नव्या करिअरची सुवर्णसंधी; रक्षा मंत्रालय गोव्यात भरवतंय रोजगार मेळा

प्रीमियम सबस्‍क्रायबर्स देखील वर्गीय रेटिंग पाहू शकतील. प्रीमियम सबस्‍क्रायबर्सना त्‍यांचं कव्‍हर लेटर व रिझ्यूम सुधारण्‍यासाठी लिंक्‍डइनच्‍या एआय-पॉवर्ड टूल्‍सवर टॅप करण्‍याचा पर्याय मिळेल.

भारतातील ५ पैकी 3 (६० टक्‍के) प्रोफेशनल्स म्‍हणतात की, ते नवीन उद्योग किंवा क्षेत्रामध्‍ये भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहेत. ३९ टक्‍के प्रोफेशनल्स संधी मिळवण्‍यासाठी यंदा नवीन कौशल्‍ये शिकण्‍याचे नियोजन करत आहेत. लिंक्‍डइन सदस्‍य २०२२ पासून त्‍यांच्‍या प्रोफाइलमध्‍ये नवीन कौशल्‍यांची भर करण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये १४० टक्‍के वाढ झाली आहे.

एअरक्राफ्ट मेन्‍टेनन्‍स इंजीनिअर, रोबोटिक्‍स टेक्निशियन आणि क्‍लोजिंग मॅनेजर हे भारतातील अव्‍वल तीन झपाट्याने विकसित होणारे रोजगार आहेत. यंदाच्‍या रँकिंगमधून सुरक्षा-केंद्रित इंजीनिअरिंग, प्रवास आणि वैयक्तिक सेवा क्षेत्र पदांमध्‍ये अधिक वाढ दिसून येते. कोरोना महामारीनंतर भारतातील बहुतांश भागांमध्‍ये व्‍यवसाय पुन्‍हा सुरळीत झाले आहेत.

नोकरी शोधणाऱ्यांसाठी काही टिप्स

हायरिंग प्रक्रियेदरम्यान तुमची अनुकूलता आणि संवाद यासारखी सॉफ्ट स्किल्स दाखवा. लिंक्डइन लर्निंग कोर्सेससह तुम्ही कौशल्य वाढवू शकता, जसं की बिल्डिंग करिअर अ‍ॅजिलिटी अँड रेझिलियन्स इन द एज ऑफ एआय, जे ३१ मार्च २०२५ पर्यंत मोफत आहेत.

तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण नियोक्‍ते उमेदवारांमधील टॅलेंट शोधण्‍यासोबत त्‍यांच्‍याबाबत अधिक माहिती मिळवण्‍यासाठी प्रथम प्रोफाइल पाहतात. वरचढ ठरण्‍यासाठी एक्‍स्‍पेरिअन्‍स सेक्‍शनमध्‍ये तुमची कौशल्‍ये नमूद करा.

LinkedIn Survey
Goa Drug Cases: बार्देशात गुन्हा शाखेचा कडक छापा; लाखभर रुपयांच्या गांजासह बंगळूरमधला युवक जेरबंद

कोणत्याही नोकरीच्या पोस्टिंगसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि पात्रता काही सेकंदात पटकन समजून घेण्यासाठी लिंक्डइनच्या नवीन जॉब मॅच वैशिष्ट्याचा वापर करा. नोकरीची संधी कुठे आहे, वर्क-फ्रॉम-होम आहे की नाही, नोकरीचं ठिकाणं याबाबतची माहिती घेऊन नोकरीसाठी अर्ज करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com