Akshata Chhatre
१६ जानेवारी १९६७ च्या दिवशी गोव्यात ओपिनियन पोलचा कौल झाला होता आणि आज या ऐतिहासिक निवडणुकीला ५८ वर्ष पूर्ण होतायत.
त्याकाळी गोव्यात मराठीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करावी आणि महाराष्ट्रात समाविष्ट करावे अशी मागणी केली गेली. गोव्याला महाराष्ट्रात समाविष्ट करावं का स्वतंत्र ठेवावं यावर मतदान घेण्यात आलं होतं.
त्यावेळी ८१.७०% लोकं मतदानाला उपस्थित होते, ज्यात ५४.२०% लोकांनी गोव्याला स्वतंत्र राज्य करावे या निर्णयाचे समर्थन केले.
तर ४३.५०% लोकांनी गोव्याला महाराष्ट्राशी जोडवे या निर्णयाचे समर्थन केले.
या मतदानामुळे आज गोवा एक स्वतंत्र राज्य म्हणून ओळखले जाते.
आणि या मतदानामुळे गोव्याने स्वतःची अशी वेगळी संस्कृती, भाषा आणि ओळख जपली आहे.