Life imprisonment for three including the one who cut off the wife's nose:
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी एका महिलेचे नाक कापणाऱ्या पतीसह तिघांना विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका आरोपीवर बलात्काराचा आरोपही सिद्ध झाला.
जिल्ह्यातील आरोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. 22 सप्टेंबर 2020 रोजी या प्रकरणातील पत्नी पती सोबत बँक खाते उघडण्यासाठी आरोनहून रामपूरला जात होते.
दोघेही अज्ञात ट्रॅक्टरमध्ये बसले होते. रामपूरपूर्वी पतीने ट्रॅक्टर थांबवला आणि रामनगर राघोगड येथील चुलत भाऊ चंदू उर्फ चंदनसिंग याच्याकडून एक हजार रुपये घ्यायचे असल्याच्या बहाण्याने पत्नीला ट्रॅक्टरमधून उतरवले.
यानंतर पतीने पत्नीला एका शेताजवळ नेले. काही वेळाने चंदनसिंग उर्फ चंदू हा दुसरा आरोपी अंकेश धाकडला घेऊन आला आणि तू पती राजूसिंगवर गुन्हा का दाखल केलास, असे म्हणत महिलेला धमकावू लागला. महिलेने सांगितले की, तिचा नवरा तिला मारहाण करतो. तो वाईट वागतो, म्हणून तिने गुन्हा दाखल केला होता.
यानंतर तीन आरोपींनी महिलेला मारहाण केली. चंदू आणि अंकेश यांनी तिचा हात धरला तर पती राजूने पत्नीचे नाक कापले. यानंतर ती बेशुद्ध पडली. घटनेनंतर काही वेळातच पीडित महिलेला शुद्ध आली आणि तिने मुख्य रस्त्यावर जाऊन लोकांची मदत घेत रुग्णालयात दाखल झाली.
याप्रकरणी आरोन पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र पीडितेच्या जबाबाच्या आधारे बलात्काराच्या कलमांमध्येही वाढ करण्यात आली. सुनावणीदरम्यान पोलिसांनी एका आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे तथ्यही मांडले. वैद्यकीय तपासणी व तपासात अंकेश धाकड याच्यावर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला.
विशेष न्यायाधीश रवींद्र कुमार भद्रसेन यांनी महिलेचा पती, चंदू उर्फ चंदन सिंग आणि अंकेश धाकड यांना नाक कापल्याप्रकरणी दोषी ठरवले. तर अंकेश हा बलात्कार आणि नाक कापण्यात मदत केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाला होता.
अतिरिक्त सरकारी वकील परवेझ खान यांनी सांगितले की, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपींना प्रत्येकी २ वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.