PM Narendra Modi: उज्ज्वल इतिहास घेऊन पुढे जाऊ

PM Narendra Modi: संविधान सभेच्या स्थापनेपासून तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्याची प्रशंसा केली.
PM Narendra Modi
PM Narendra ModiGoogle image
Published on
Updated on

PM Narendra Modi: ‘मागील ७५ वर्षांच्या संसदीय इतिहासाचे सिंहावलोकन करताना बरेच चांगले व वाईट अनुभव देशाने अनुभवले आहे. या सर्व चढउतारांतून भारत तावून-सुलाखून निघाला आहे. या संसदभवनाने अनेक नेते पाहिले आहेत, अनेक घटना पाहिल्या आहेत.

हे संसदभवन सोडताना भावना अनावर होत असल्या तरी येथील उज्ज्वल इतिहास घेऊन आपण नव्या संसदभवनात जाऊ आणि लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी एकदिलाने काम करू,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

PM Narendra Modi
E Marketing: गणेशचतुर्थीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-मार्केटची सुरवात

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी सुरूवात झाली. उद्या (ता. १९) नवीन संसदभवनाचे उद्‌घाटन होणार असून त्यापार्श्वभूमीवर हे अधिवेशन सुरु झाले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुरूवातीला संसदेचा प्रवास, संविधान सभेची ७५ वर्षे, आठवणी, अनुभव व शिकवण या विषयाचा प्रस्ताव मांडला. बिर्ला यांनी या प्रस्तावाची रूपरेषा मांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 50 मिनिटे संसदेमध्ये भाषण केले. या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका टाळली. संविधान सभेच्या स्थापनेपासून तर विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्याची प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘संविधान सभेपासून या सभागृहाने अनेक नेते पाहिले आहे. हे सभागृह अनेक घटनांचे साक्षीदार आहे. आज या सभागृहातील अखेरचा दिवस आहे. यामुळे मन भरून येत आहे. हे स्वाभाविक आहे. आपले जुने घर सोडतानासुद्धा आपल्या भावना अनावर होतात. तशीच काहीशी भावना माझ्या मनात आहे. परंतु येथील उज्ज्वल इतिहास घेऊन आपण नव्या सभागृहात जाऊ व या देशाची लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करू.’’

PM Narendra Modi
Goa Police: दक्षिण गोव्यात 46 सराईत गुन्हेगार आले पोलिसांच्या रडारवर

देशात नुकतीच जी-२० परिषद यशस्वीपणे पार पडली. याची विरोधकांनीही प्रशंसा केल्याचे सांगत मोदी म्हणाले,‘‘ही प्रशंसा एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची नाही. हे यश देशाच्या १४० कोटी जनतेचे आहे. अनेक देशांनी या परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल व या परिषदेत सहमतीने संमत झालेल्या घोषणापत्राबद्दल संशय व्यक्त केला होता. परंतु या सर्व शंकांना दूर सारत देशाने जगाला नवी दिशा दाखविण्याचे काम केले.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com