'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Operation Sindur: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर प्रथमच दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा पाकिस्तानमध्ये उघडपणे एका मोठ्या रॅलीचे आयोजन करणार आहे.
LeT Terror Group
LeT Terror GroupDainik Gomantak
Published on
Updated on

Lashkar-e-Taiba Rally In Pakistan: भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindur) द्वारे पाकिस्तानात केलेल्या कारवाईनंतर जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लश्कर-ए-तैयबा (LeT) सारख्या मोठ्या दहशतवादी संघटना हादरल्या. भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले हे सर्व दहशतवादी गट आता स्वतःला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा पाकिस्तानात उघडपणे एका मोठ्या रॅलीचे आयोजन करणार आहे.

भारताच्या हल्ल्यानंतर लष्करचे शक्तिप्रदर्शन

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने मिसाईल हल्ला करुन लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय (Headquarter) उद्ध्वस्त केले होते. भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ पूर्णपणे नष्ट झाले होते आणि यात 100 दहशतवादी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर लश्कर पुन्हा आपली ताकद दाखवण्यासाठी या विशाल खुल्या रॅलीचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कर देखील सहभागी झाले होते. तसेच, त्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेला एक खतरनाक दहशतवादीच आता लष्करच्या या मोठ्या रॅलीचा चेहरा बनणार आहे.

LeT Terror Group
Operation Sindoor: "एफ-16, जेएफ-17 सह पाकिस्तानची 10 विमानं पाडली" ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा Watch Video

लष्करचा नवा चेहरा कोण?

लष्कर-ए-तैयबाने या रॅलीसाठी जारी केलेल्या पोस्टरवर सैफुल्ला कसुरी याचा फोटो लावण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सैफुल्ला कसुरी चर्चेत आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीत प्रतिबंधित दहशतवादी हाफिज सईदचा संदेश वाचला जाण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना एकत्र आणण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा भाग म्हणून ही रॅली आयोजित केली जात असून सैफुल्ला कसुरीला या रॅलीचा मुख्य चेहरा बनवले जात असल्याची चर्चा आहे.

रॅली कधी आणि कुठे?

लष्कर-ए-तैयबाची ही विशाल रॅली आगामी 2 नोव्हेंबर रोजी लाहोरमधील ऐतिहासिक मिनार-ए-पाकिस्तान येथे होणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी चर्चेत आलेला दहशतवादी हाफिज अब्दुल रऊफ याने जास्त गर्दी जमा करण्यासाठी आवाहन केले आहे. 2 नोव्हेंबरला होणाऱ्या लाहोरमधील या रॅलीवर भारतीय गुप्तचर संस्थांचीही करडी नजर असणार आहे. सूत्रांनुसार, या रॅलीमध्ये लष्कर-ए-तैयबाचे ते सर्व मोठे दहशतवादी सामील होण्याची शक्यता आहे, जे भारतात 'वॉन्टेड' आहेत.

LeT Terror Group
Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

लष्करला पुन्हा उभे करण्याचे पाक लष्कराचे नियोजन

सूत्रांच्या मते, या रॅलीच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाला पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, यासाठी पाकिस्तानी लष्कर (Pak Army) योजना आखत आहे. केवळ भारताविरुद्धच नाही, तर TTP (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) समोर खैबर पख्तूनख्वामध्ये (Khyber Pakhtunkhwa) पाकिस्तानी लष्कराला या लष्करच्या दहशतवाद्यांना तैनात करायचे आहे, अशी माहिती मिळाली आहे.

ही रॅली लष्कर-ए-तैयबाच्या पॉलिटिकल विंग असलेल्या पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग (PMML) या संस्थेच्या बॅनरखाली बोलावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com