हे काय घडलं शेवटच्या चेंडूवर? विजयासाठी 1 रनची गरज असताना ट्वीस्ट, हातची मॅच गमावली; Watch Video

Bizarre Last Ball Run Out: इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या लेस्टरशायर आणि डर्बीशायर यांच्यातील सामन्याची सांगता अविश्वसनीय पद्धतीने झाली.
Bizarre Last Ball Run Out
Bizarre Last Ball Run OutDainik Gomantak
Published on
Updated on

Bizarre Last Ball Run Out: क्रिकेटच्या इतिहासात अनेक रोमहर्षक सामने झाले आहेत, पण इंग्लंडमध्ये (England) खेळल्या गेलेल्या लेस्टरशायर आणि डर्बीशायर यांच्यातील सामन्याची सांगता अविश्वसनीय पद्धतीने झाली. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या या सामन्याचा निकाल बरोबरीत लागला, जो शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक होता. दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. एका फलंदाजाच्या विचित्र पद्धतीने धावबाद झाल्यामुळे डर्बीशायरच्या हातून विजय निसटला.

लेस्टरशायरने उभारला 312 धावांचा डोंगर

दरम्यान, या सामन्यात लेस्टरशायरच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 5 गडी गमावून 312 धावांचा डोंगर उभा केला होता. लेस्टरशायरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. 313 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना डर्बीशायरच्या संघानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांचा एकही फलंदाज फार काळ मैदानावर थांबला नाही तरी, प्रत्येक फलंदाजाने छोटेखानी उपयुक्त खेळी करत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. अखेर, सामना अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला, जेव्हा डर्बीशायरला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर केवळ एका धावेची गरज होती.

Bizarre Last Ball Run Out
India vs England: भारत-इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान लॉर्ड्सवर 'हाय अलर्ट', सुरक्षा वाढवण्यात आली; 'हे' आहे कारण

शेवटच्या षटकातील नाट्यमय थरार

डर्बीशायरला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर असलेल्या जॅक चॅपेल याने पहिल्या तीन चेंडूंवर दोन चौकार आणि एक दुहेरी धाव घेत 12 धावा कुटल्या आणि सामना जवळजवळ आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. यानंतर एक वाइड चेंडू पडल्याने दोन्ही संघांची धावसंख्या 312 अशी बरोबरीत आली. आता विजयासाठी केवळ एक धाव हवी असताना, गोलंदाज टॉम स्क्रीवनने पुढचे दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती आणि क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखून धरले होते.

अखेरच्या क्षणी काय घडले?

शेवटच्या चेंडूवर जॅक चॅपेलने लेग साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या थाय पॅडला लागून जवळच थांबला. दुसऱ्या बाजूला असलेला फलंदाज रोरी हेयडन विजयाच्या आशेने धावण्यासाठी पळाला. त्याला पाहून चॅपेलनेही दुसऱ्या टोकाकडे धाव घेतली, पण त्याच क्षणी त्याच्या हातातून बॅट सुटून पडली. बॅट वाचवण्याच्या नादात चॅपेल खेळपट्टीवरच पडला. याचा फायदा घेत लेस्टरशायरचा यष्टीरक्षक जॉर्डन कॉक्सने चेंडू नॉन-स्ट्राइकरच्या दिशेने फेकला आणि चॅपेल धावबाद झाला.

चॅपेल धावबाद झाल्यामुळे डर्बीशायरच्या खात्यात केवळ 312 धावा जमा झाल्या आणि लेस्टरशायरच्याही तितक्याच धावा असल्याने सामना बरोबरीत सुटला. या घटनेने दोन्ही संघातील खेळाडू आणि प्रेक्षकही स्तब्ध झाले.

Bizarre Last Ball Run Out
England vs West Indies: इंग्लंड विरूध्द वेस्ट इंडिज सामन्याने रचला अनोखा 'विश्वविक्रम', टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडलं

पॉइंट्स टेबलमध्ये स्थिती

हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना 2-2 गुण मिळाले. यामुळे लेस्टरशायर 10 गुणांसह ग्रुप-ए मध्ये सातव्या क्रमांकावर आहे, तर डर्बीशायर 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. लेस्टरशायरला अजून 2 आणि डर्बीशायरला 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com